संजय राऊतांच्या स्वागत मिरवणूकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी
By मुरलीधर भवार | Published: April 16, 2024 07:36 PM2024-04-16T19:36:08+5:302024-04-16T19:38:22+5:30
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.
कल्याण - अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे एका मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यक्रमासाठी आले होते. त्यांची नेवाळी नाक्यावरुन जोरदार स्वागत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी स्वागताच्या जीप गाडीवर खासदार राऊत यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या कल्याण लाेकसभा मतदार संघाच्या उमेदवार वैशाली दरेकर या होत्याच. मात्र त्याच जीपवर आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील स्वार झाल्या होत्या. त्यामुळे महायुतीला पुन्हा एकदा जोर का झटका बसला आहे.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे ते सध्या तळोजा कारागृहात आहे. दरम्यान भाजप आमदार गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचे काम करणार नाही. कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी द्यावी असा ठराव केला. त्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना करावा लागला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी वर्गाची बैठक घेऊन कल्याण पूर्वेतील वाद संपला असल्याचे म्हटले हाेते. वाद संपुष्टात आला असल्याचे सांगितले जात असले तरी नववर्ष स्वागत यात्रेत गुढी पा्डव्याला भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांची गळाभेट घेऊन त्यांना नववर्षाच्या सुभेच्छा दिल्या होत्या. शुभेच्छा कोणी कोणाला देऊ शकतो अशी सारवासारव आमदार गायकवाड गटाकडून केली गेली. आज पुन्हा गोरपे गावातआमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राऊत यांच्या स्वागत मिरवणूकीत सहभागी झाल्याने या कल्याण पूर्वेतील शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद संपुष्टात आलेला नाही हेच अधोरेखीत झाले.
खासदार शिंदे फाऊंडेशनकडे जनतेच्या लूटीचा पैसा - राऊत
त्यांचेकडे लुटलेले पैसे आहेत.हा जनतेच्या लूटीचा पैसा बोलतो असा हल्लाबोल पुन्हा खासदार संजय राऊत यांनी खासदार ॰ीकांत शिंदे यांच्यावर केला आहे. इतकेच नाही तर ठाकरेकडून ला’न्च करण्यात आलेले गीत सुरुच राहणार. धनुष्यबाण तुमचा आहे का ? हे आत्मचिंतन करा असेही खासदार राऊत यांनी असा सवाल शिंदेसेनेला विचारला आहे.
खासदार राऊत यांचे स्वागत मिरवणूक निघणार आहे याची पूर्व कल्पना पोलिस प्रशासनाला हाेती. त्यामुळे पोलिसांकडून उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ््याना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. पदाधिकाऱ्यांनी नोटिसांना न जुमानता कार्यक्रमात सहभागी होणे पसंत केले. या नोटिसांचेही उत्तर दिले जाईल. दोन महिने थांबा अशी उत्तर खासदरा राऊत यांनी दिले आहे.