सर्वोत्कृष्ट पोलिस घटक २०२१ स्पर्धेत पोलिस अधीक्षक रायगड यांचा द्वितीय क्रमांक

By मुरलीधर भवार | Published: January 3, 2023 06:27 PM2023-01-03T18:27:25+5:302023-01-03T18:27:48+5:30

पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी वार्षिक गुन्हेगारीच्या आधारे श्रेणी ठरविले जाते.

Superintendent of Police Raigad 2nd place in Best Police Unit 2021 competition | सर्वोत्कृष्ट पोलिस घटक २०२१ स्पर्धेत पोलिस अधीक्षक रायगड यांचा द्वितीय क्रमांक

सर्वोत्कृष्ट पोलिस घटक २०२१ स्पर्धेत पोलिस अधीक्षक रायगड यांचा द्वितीय क्रमांक

googlenewsNext

कल्याण - महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सर्वोत्कृष्ट घटक पोलिस स्पर्धा घेण्यात येते. या पोलिस स्पर्धेचा २०२१ सालचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक आला आहे. त्यांच्या युनिटने केलेल्य कामागिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. २०२१ मध्ये सचिन गुंजाळ हे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड या पदावर कार्यरत होते आणि सध्या गुंजाळ हे कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पदी कार्यरत आहेत.

पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी वार्षिक गुन्हेगारीच्या आधारे श्रेणी ठरविले जाते. त्यानुसार चांगली कामगिरी करणा:यां पोलिस युनिटची निवड केली जाते. ज्या कार्यक्षेत्रत वर्षाला ६१०० पेक्षा कमी गुन्हे घडतात. त्या कार्यक्षेत्रला गौरविले जाते. रायगड अलीबाग या कार्यक्षेत्रची २०२१ सालची ए श्रेणीत निवड झाली असू द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. हा निकाल जाहिर होताच गुंजाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गुंजाळ हे सध्या कल्याणचे पोलिस उपायुक्त आहे. याठिकाणीही गेल्या वर्षभरात गुंजाळ यांची कामगिरी चांगली असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाकडूनही गुंजाळ यांच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली आहे.
 

Web Title: Superintendent of Police Raigad 2nd place in Best Police Unit 2021 competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.