कल्याण-तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; मेट्रो १२ला गती

By मुरलीधर भवार | Published: November 4, 2022 03:08 PM2022-11-04T15:08:38+5:302022-11-04T15:11:22+5:30

मुंबईसह ठाणे पल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे.

Survey of Kalyan-Taloja Metro in final phase; Metro 12 | कल्याण-तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; मेट्रो १२ला गती

कल्याण-तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; मेट्रो १२ला गती

googlenewsNext

कल्याण - कल्याण, डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला थेट मुंबई, नवी मुंबई आणि तळोजाशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण - तजोळा या मेट्रो १२ प्रकल्पाला गती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पाचे काम वेगाने हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे गेल्या महिन्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाचे तातडीने सर्वेक्षणसुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यापुढील कामांना लवकरच सुरूवात होईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.

मुंबईसह ठाणे पल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. या मार्गांमुळे लवकरच या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठाणे –भिवंडी–कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण–डोंबिवली–तळोजा मेट्रो १२ हा मार्ग महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

खासदार शिंदे या मेट्रो मार्गासाठी आग्रही आहेत. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, उपनगरातून ठाण्यात येणारा प्रवासी आणिठाणे शहरातला प्रवासी भिवंडी, कल्याण आणि थेट तळोजा तसेच नवी मुंबईला जोडला जाणार आहे. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील, शेजारच्या अंबरनाथ तालुक्यातील शहर आणिगावांतील प्रवासी थेट ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईला जाऊ शकणार आहेत. त्यामुळे मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण तसेच थेट नवी मुंबई असा सलग प्रवास विनासायास आणि आरामदायी पद्धतीने करता येणारआहे. त्यामुळे या मार्गाची जलदगतीने उभारणी महत्वाची आहे. 

या मार्गाच्या उभारणीसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गेल्याच महिन्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली होती. आजपर्यंत या सर्वेक्षणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम येत्या २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतरमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.

अशी आहे मेट्रो १२
कल्याण तळोजा ही मेट्रो मार्गिका ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते तळोजा हे कल्याणमार्गे अंतर सहजरित्या कापता येणार आहे. हा मार्ग एकूण २०.७५ किलोमीटरलांबीचा असून यात १७ मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासूनहा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीणभागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक आहे. या मार्गामुळे शहरी भागासहग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे.
 

Web Title: Survey of Kalyan-Taloja Metro in final phase; Metro 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.