सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

By मुरलीधर भवार | Published: December 8, 2022 09:22 PM2022-12-08T21:22:10+5:302022-12-08T21:23:16+5:30

आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य.

Sushma Andhare accuses Devendra Fadnavis separatist politics of border dispute targets bjp over various issues | सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

googlenewsNext

कल्याण: भाजपा आणि टीम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राचा अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रकार ठरवून सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र  देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत. गुजरातच्या निवडणूक सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हटलं की महाराष्ट्रातले गाव कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजपने जाती जातीत भांडत लावत होते. धर्मा धर्मात भांडण लावत होता. आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे. याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  केला आहे.

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या आधी नेत्या अंधारे यांनी उपरोक्त आरोप केला आहे. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो यातच आमचा विजय आहे असे अंधारे यांनी सांगितले.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी संजय राऊत चिथा वणीकर भाषण देतात असा आरोप केला होता याबाबत बोलताना अंधारे यांनी बावनकुळे साहेब जर असं नाही बोलले तर त्यांचा प्रदेशाध्यक्ष पद जाऊ शकतो. महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र चाले अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी असच बोलले पाहिजेत. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे. तुम्ही काही बोलला तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो. बावनकुळेंच्या बोलण्याचा मला फार काही विशेष वाटत नाही.

महाप्रबोधन यात्रेबाबत शिंदे गटाकडून सातत्याने टीका केली जाते याबाबत बोलताना अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रा सूनियोजित पक्षाचा कार्यक्रम आहे मात्र शिंदे गटाने पैसा प्रचंड पेरला. प्रचंड माणसं तोडली मात्र एवढी सगळी माणसं तोडून सुद्धा अजेंड्यावर काम करायला एकही माणूस नाही. म्हणजे सगळं गाव मामाचा एक नाही कामाचा अशी त्यांची अवस्था आहे. त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करण्यास एकही माणूस नसेल तर त्यांचा दोष काय पैशांवर माणसं विकत घेता येऊ शकतात. पैशावर बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येऊ शकत नाही असे अंधारे सांगितले.

संजय राऊत यांची सुरक्षा काढल्या बाबत बोलताना अंधारे यांनी त्यांच्या हातात सत्ता आहे तर कोणावर कसे ही आत टाकू शकतात. कोणाचीही सुरक्षा काढून घेऊ शकतात. त्यांच्याच पक्षातील लोकांकडून ज्यांना रेडे बोलले आहे. त्यांना सुरक्षा पुरवू शकतात..रेड्यांना सुरक्षा द्यायची आणि माणसांची सुरक्षा काढायची हे सगळं त्यांचं चालत राहील असा टोला शिंदे गटाला लगावाला.

मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर घे रेशन आणि कर भाषण अशी टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे यांनी इलका तुम्हारा धमाका हमारा ,पाठीमागून बोलायला आवडत नाही राजू पाटील यांची हौस पूर्ण करेन असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे टोमणास्त्र आहे अशी टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे यांनी तो त्यांच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. मुळात लेकी बोले सूने लागे असे त्यांना का वाटते. उद्धवजी जे बोलत आहे त्यांच्यासाठी आहे असं त्यांना वाटतं याचा अर्थ असा आहे तीर बहुत सही निशाने पे लगा है असा टोला देवेंद्र फडणवीस यांना अंधारे यांनी लगावला.

महाराष्ट्र पाकिस्तानात नाही कर्नाटक पाकिस्तानच नाही तरीसुद्धा ते गलिच्छ राजकारण ज्या पद्धतीचे केले जाते त्यामुळे दोन राज्यात वितुष्टवाद वाढतोय. आता राज्यातही तुमची सत्ता केंद्रातही तुमची सत्ता आहे. आमचे एकनाथ भाऊ आम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी निघालो आहोत, असे बोलत होते. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान होतो. अस्मिता पायदळी तुडवला जाते. गावेच्या गावे ओढली जातात हे सगळं होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अगदी गप्प घर बसलेले असतात कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे राज्याची बाजू मांडतात एकनाथ भाऊ बाजू मांडण्यासाठी दिल्लीश्वराची परमिशन मिळाली नाही का? कदाचित परमिशन देण्याचे ते वाट पाहतात का असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

पत्रकारांमधूनच प्रश्न विचारले जातात. राव तर नंतर सुषमा अंधारे यांचा नंबर आहे. कशासाठी नंबर असेल? माझ्यावर लावता येत नाही म्हणून खोट्या केस टाकल्या जाणार आहेत का? माझा घात केला जाणार आहे का? अपघातात मला भीती आहे का? माझा एखादा अपघात घडवून आणू शकतो का? जे करायचे ते करा. भय भ्रम चरित्र हत्या ही सगळे अस्त्र वापरून झाली. आहेत याचा पलीकडे काही असतील तर ते काढून बघा असे आव्हान शिंदे गटासह भाजपाला अंधारे यांनी केले आहे.

Web Title: Sushma Andhare accuses Devendra Fadnavis separatist politics of border dispute targets bjp over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.