कुजबुज! कल्याणच्या सभेपूर्वी अचानक सुषमा अंधारेंच्या डोळ्यापुढे आली अंधारी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 09:06 AM2022-12-10T09:06:38+5:302022-12-10T09:07:04+5:30

कल्याण येथील सभेत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

Sushma Andhare, who had gone to Kalyan for a meeting, felt uneasy | कुजबुज! कल्याणच्या सभेपूर्वी अचानक सुषमा अंधारेंच्या डोळ्यापुढे आली अंधारी, कारण...

कुजबुज! कल्याणच्या सभेपूर्वी अचानक सुषमा अंधारेंच्या डोळ्यापुढे आली अंधारी, कारण...

Next

कल्याण - शिवसेना विभागली गेल्यावर व संजय राऊत तुरुंगात असताना सुषमा अंधारे नामे मुलुखमैदानी तोफ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला लाभली. नाट्यपूर्ण अभिनिवेशात वक्तव्य करून त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या भल्याभल्या नेत्यांचे बीपी वाढवल्याची कुजबुज आहे.

गुरुवारी अंधारे कल्याणमध्ये जाहीर सभेकरिता आल्या असता  त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तपासणीत त्यांचा रक्तदाब कमी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सभा रद्द न करता विरोधकांचे बीपी वाढवणाऱ्या अंधारे बीपी लो असतानाही सभेला रवाना झाल्या. 

सभेत अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

भाजपा आणि टीम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राचा अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रकार ठरवून सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र  देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत. गुजरातच्या निवडणूक सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हटलं की महाराष्ट्रातले गाव कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजपने जाती जातीत भांडत लावत होते. धर्मा धर्मात भांडण लावत होता. आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे. याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  केला.

तर संजय राऊत यांची सुरक्षा काढल्या बाबत बोलताना अंधारे यांनी त्यांच्या हातात सत्ता आहे तर कोणावर कसे ही आत टाकू शकतात. कोणाचीही सुरक्षा काढून घेऊ शकतात. त्यांच्याच पक्षातील लोकांकडून ज्यांना रेडे बोलले आहे. त्यांना सुरक्षा पुरवू शकतात.रेड्यांना सुरक्षा द्यायची आणि माणसांची सुरक्षा काढायची हे सगळं त्यांचं चालत राहील असा टोला शिंदे गटाला लगावाला.

Web Title: Sushma Andhare, who had gone to Kalyan for a meeting, felt uneasy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.