ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया स्थगित करा, माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
By अनिकेत घमंडी | Published: October 11, 2022 07:11 PM2022-10-11T19:11:18+5:302022-10-11T19:11:59+5:30
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने २६ ऑगस्ट रोजी उमेदवारांकडून नवीन अर्ज मागितले होते.
डोंबिवली : ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँकेच्या भरतीमध्ये असूत्रता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून सदर भरती प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मंगळवारी निवेदनाद्वारे केली. त्याबाबत पवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्यात ही मागणी केली आहे. दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने २६ ऑगस्ट रोजी उमेदवारांकडून नवीन अर्ज मागितले होते.
सदर पदभरती प्रक्रियेत अनेक युवकानी सहभाग घेतला आहे. २४ सप्टेंबर रोजी परिक्षा प्रक्रिया झाली असून नुकताच निकाल व यादी जाहीर झाली असून या भरती प्रक्रियेत अनधिकृत रित्या आर्थिक व्यवहार झाल्याचे झाल्याचा आरोप झाला आहे. भरती प्रक्रिया नियमानुसार न होणे, मेरीट प्रमाणे भरती न होणे, व योग्य उमेदवाराची पदभरती न होणे या प्रकारामुळे भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ निदर्शनास आला असल्याचा आरोप नरेंद्र पवार यांनी केला आहे. यामुळे सदर भरती प्रक्रियेवर स्थगीती द्यावी व सदर प्रकरणाची समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली असल्याचे पवार यांनी सांगितले.