केडीेएमसी हद्दीतील 27 गावांच्या पाणीपुरवठ्यावर कपातीची टांगती तलवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:57 PM2021-03-16T14:57:53+5:302021-03-16T14:58:23+5:30

केडीएमसीने थकवली एमआयडीसीची देयके

Sword of cuts on water supply of 27 villages in KDMC limits | केडीेएमसी हद्दीतील 27 गावांच्या पाणीपुरवठ्यावर कपातीची टांगती तलवार 

केडीेएमसी हद्दीतील 27 गावांच्या पाणीपुरवठ्यावर कपातीची टांगती तलवार 

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 27 गावांना दररोज 48 नलजोडण्याद्वारे 78 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो

कल्याण - 27 गावांमध्ये केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची देयके (पाणी बिल) कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अदा न करण्यात आल्याने एमआयडीसीने या गावातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात 27 गावांतील नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.  

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 27 गावांना दररोज 48 नलजोडण्याद्वारे 78 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी दर महिन्याला केडीएमसीकडून 1 कोटी 90 लाख रुपये मासिक देयक प्राप्त होणे अपेक्षित आहे. या देयकांचा भरणा करण्यासाठी वारंवार विनंती करूनही गेल्या वर्षभरापासून केडीएमसीने ती रक्कम न भरल्याचे एमआयडीसीने केडीएमसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. जानेवारी 2021 पर्यंत ही एकूण थकबाकीची रक्कम तब्बल 422 कोटींच्या घरात गेली आहे. एमआयडीसीचे अधिकारी संजय ननावरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून थकबाकीबाबत केडीएमसीला पत्र दिल्याचेही लोकमतशी बोलताना  सांगितले. 

एकूण थकबाकीपैकी  निव्वळ थकबाकी 101 कोटी असून 235 कोटींहून अधिक विलंब शुल्काची रक्कम आहे. तर फेब्रुवारी 2020 नंतर केडीएमसीकडून मासिक देयके अदा करण्यात आलेली नाही.

Web Title: Sword of cuts on water supply of 27 villages in KDMC limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.