विद्यानिकेतन शाळेत शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दूषप्रवृत्ती रावणाचे प्रतिकात्मक दहन
By अनिकेत घमंडी | Published: October 23, 2023 07:43 PM2023-10-23T19:43:56+5:302023-10-23T19:44:11+5:30
शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रावणाचे म्हणजेच दुषप्रवृत्तीचे दहन करण्यात आले.
डोंबिवली: येथील विद्यानिकेतन शाळेमध्ये संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रावण दहन कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला. समाजात असलेली भ्रष्टाचार वृत्ती, पर्यावरण ऱ्हास, लाचखोरी, राष्ट्रपुरुष अवमान, राजकीय अस्थिरता, स्त्रियांवरील अत्याचार, दुष्पप्रवृत्ती, आळस, सामाजिक अस्थिरता यांसह केवळ चंगळवाद करण्यासाठी असलेल्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी रावण दहन करून कष्ट, संस्कार, संस्कृती दर्शक वातावरण निर्माण व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. फुटबॉल ग्राऊंडमध्ये शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रावणाचे म्हणजेच दुषप्रवृत्तीचे दहन करण्यात आले.