डोंबिवली क्रीडा संकुलातील टेबल टेनिस कोर्ट सज्ज; लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

By मुरलीधर भवार | Published: November 11, 2022 05:36 PM2022-11-11T17:36:35+5:302022-11-11T17:37:02+5:30

कल्याण डोंबिवलीतील अनेक टेबल टेनिस खेळाडूना ह खेळाचा सराव करण्यासाठी ठाणे, मुलुंड, घाटकोपर याठिकाणी जावे लागत होते.

Table tennis court at Dombivli sports complex ready; Will be open for players soon | डोंबिवली क्रीडा संकुलातील टेबल टेनिस कोर्ट सज्ज; लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

डोंबिवली क्रीडा संकुलातील टेबल टेनिस कोर्ट सज्ज; लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

googlenewsNext

डोंबिवली-संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात टेबल टेनिस खेळणा:या खेळाडूंसाठी सुसज्ज टेबल टेनिस कोर्ट तयार करण्यता आले आहे. हे टेबल टेनिस कोर्ट लवकर खेळाडूंसाठी खुले करण्यात येणार आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्थायी समिती सभापती असताना क्रिडा संकुलातील टेबल टेनिस कोर्ट तयार करण्याकरीता 27 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. कोरोना काळात हे काम होऊ शकले नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होताच या कामाला गती देण्यात आली. याठिकाणी आठ टेबल टेनिस टेबल बसविण्यात आले आहे. उर्वरीत तीन टेबल बसविण्याचे काम लवकर केले जाणार आहे. याठिकाणी खेळाडूंना चेचिंग रुमसह अन्य सोयी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कामाची पाहणी आज माजी सभापती म्हात्रे यांनी केली. यावेळी टेबल टेनिस खेळातील छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रृती कानडे या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी टेबल टेनिस खेळाडू टेबल टेनिसचा सराव करणार आहेत.

याठिकाणी टेबल टेनिस खेळाडूंना सरावासाठ टेबल टेनिस कोर्ट नव्हते. कल्याण डोंबिवलीतील अनेक टेबल टेनिस खेळाडूना ह खेळाचा सराव करण्यासाठी ठाणे, मुलुंड, घाटकोपर याठिकाणी जावे लागत होते. आत्ता टेबल टेनिस कोर्ट तयार झाल्याने खेळाडूंना सरावासाठी अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. डोंबिवलीतून टेबल टेनिस खेळाडून अनेक पातळ्य़ावर टेबल टेनिसच्या स्पर्धात सहभागी होता. त्यांच्यासाठी सुसज्ज टेबल टेनिस कोर्ट लवकर खुले होणार असल्याचे माजी सभापती म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: Table tennis court at Dombivli sports complex ready; Will be open for players soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.