'त्या' बेकायदा इमारतीवर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

By मुरलीधर भवार | Published: November 11, 2022 04:00 PM2022-11-11T16:00:17+5:302022-11-11T16:01:23+5:30

कारवाई केली गेली नाही. तर प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित तीन प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Take action against illegal building Order of KDMC Commissioner | 'त्या' बेकायदा इमारतीवर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

'त्या' बेकायदा इमारतीवर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

Next

कल्याण-बिल्डर फसवणूक प्रकरणी ६५ बिल्डरांच्या विरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात यावी. कारवाई केली गेली नाही. तर प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित तीन प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन काही बिल्डर व त्यांच्या हस्तकांनी महापालिकेच्या बांधकाम परवानग्या तयार केल्या. ज्या महापालिकेने दिलेल्याच नाही. त्याच परवानग्यांच्या आधारे त्यांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. ही बाब वास्तू विशारद संदीप पाटील यांनी उघड केली. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने या प्रकरणात ६५ बिल्डरांच्या विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहेत. दरम्यान रेराने ५२ बांधकाम प्रकरणात दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. मात्र ही फसवणूक महापालिका, राज्य सरकार आणि रेरा या तिन्ही प्राधिकरणांची आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त दांगडे यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी ज्या प्रभागांच्या हद्दीत ही बेकायदा बांधकामे झाली आहे. 

ज्यांच्या खोटय़ा बांधकाम परवानग्या तयार केल्या आहे. त्या प्रभागाच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करुन कारवाईचा अहवाल तयार करण्याचे सूचित केले. आयुक्तांच्या आदेशापश्चात संबंधित प्रभाग अधिका:यांकडून काही एक कार्यवाही झालेली दिसून येत नाही. त्यामुळे महापालिका आायुक्तांनी काल 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा आदेश काढले आहेत. ज्या बेकायदा बांधकाम इमारतीत रहिवासी राहतात. त्या बांधकाम इमारती रहिवास मुक्त करण्यात याव्यात. तसेच ज्या बेकायदा बांधकाम इमारतीत रहिवासी राहत नाही. त्या इमारतीवर कारवाईचा हातोडा चालविण्यात यावा. या इमारती पाडण्यात याव्यात असे आदेश दिले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणी काही निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दिसून आाल्यास संबंधित प्रभाग अधिका:यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आत्ता त्या बेकायदा इमारतीवर कारवाईचा हातोडा चालण्यास सुरुवात होणार हे आयुक्तांच्या आदेशातून स्पष्ट होत आहे.
 

Web Title: Take action against illegal building Order of KDMC Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण