‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

By प्रशांत माने | Published: October 3, 2022 04:33 PM2022-10-03T16:33:46+5:302022-10-03T16:34:37+5:30

Kalyan News: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला आहे.

Take action against 'those' vehicles, otherwise fierce agitation, Manvise warns RTOs | ‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

googlenewsNext

- प्रशांत माने
 कल्याण - काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नम ऐरणीवर आला असून जे बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आरटीओला निवेदनाद्वारे दिला आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्राअंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ही शहरे येतात. पनवेल-खारघरमध्ये शॉर्टसर्कीटमुळे धावत्या स्कूलबसला आग लागल्याच्या १२ सप्टेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमतने कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थी वाहतूकीचा आढावा घेता आरटीओच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली होती. यावर ‘स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये मेंढरासारखे भरतात विद्यार्थी’ या मथळयाखाली लोकमतमध्ये १४ सप्टेंबरला बातमी प्रसिध्द केली होती.

दरम्यान सात दिवसांपूर्वी अंबरनातमध्ये घडलेल्या घटनेमुळे वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्र घेतला आहे. सोमवारी मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओचे अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. आरटीओ परिक्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणा-या वाहनांची तसेच स्कूलबसची तपासणी करावी, बेकादेशीरपणे वाहतूक करणा-या आणि विद्यार्थ्यांच्या जीविताबरोबर खेळणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनविसेचे कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिला. यावर कल्याण आरटीओकडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून ते आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे साळवी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

Web Title: Take action against 'those' vehicles, otherwise fierce agitation, Manvise warns RTOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.