मीटरने प्रवासी घ्याच, RTO अधिकारी रस्त्यावर; २ तासात ५७ हजारांचा दंड वसूल
By अनिकेत घमंडी | Published: December 9, 2022 01:28 PM2022-12-09T13:28:58+5:302022-12-09T13:29:49+5:30
विनाकारण वाहतूक कोंडी करू नका, प्रवाशांना तक्रारिसाठी मोबाइल, इमेल आयडी
अनिकेत घमंडी/डोंबिवली
डोंबिवली - मीटरने भाडे नाकारणे, विनाकारण शिस्त मोडून वाहतूक।कोंडी करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी स्वतः।कल्याणचे सह परिवहन।अधिकारी विनोद साळवी यांनी रस्त्यावर उतरून मनमानी करणाऱ्या।रिक्षाचालकांविरोधात शुक्रवारी कारवाई केली. रेल्वे स्टेशन।परिसरात दीपक हॉटेल ते बस स्टॅण्ड आय ठिकाणी नाहक कोंडी होत।असून त्याला काही उपद्रवी रिक्षाचालक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार असे ते म्हणाले. वाहतूक नियंत्रण विभाग, आरटीओ या दोन्ही यंत्रणा त्यासाठी सज्ज असून शिस्तीने वागा अन्यथा कारवाई अटळ अशी भूमिका आरटीओने घेतली आहे.
वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी स्वतः मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी त्या दृष्टीने पावले उचलली आहेत, त्याला रिक्षा चालकांनी प्रतिसाद देणे गरजेचे असून तसे न झाल्यास कारवाईला सामोरे।जावे।लागेल।असे ते म्हणाले. सकाळच्या पहिल्या सत्रात दोन तासांमध्ये त्यांच्या पथकाने ९ केस करून ५७ हजारांचा दंड वसूल।केला, दिवसभर कारवाई सुरू राहणार असल्याचे।ते म्हणाले. केवळ अधिकारी आले, आरटीओ, ट्रॅफिकच्या गाड्या आल्या की तेवढ्या पूरता सगळे काही आलबेल असल्याचे दाखवून चालत नाही, त्यात सातत्य हवे, त्यासाठी शिस्त अंगी बाणावी लागेल असेही ते म्हणाले. काही रिक्षा चालकांचे त्यांनी प्रबोधन करत शिस्तीचा फायदा सगळ्याना हा मंत्र दिला. पण बेशिस्तीला कोणी वाली नाही, वेळीच सुधारणा करून बदलघडवा असे, आवाहन त्यांनीकेले.
मुंबई, ठाणे या सर्व ठिकाणी मीटरने प्रवास केला जातो, कल्याण आरटीओला काय वेगळा नियम आहे का? असा सवाल त्यांनी रिक्षाचालकांना।केला, त्यासाठी संबंधित रिक्षा युनियनला देखील त्यांनी पत्र।दिले असून त्याचा परिणाम झाला नसक्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त।केली. आयुक्त दांगडे हे सकारात्मक असून त्यांनी आरटीओ, ट्रॅफिक विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच सकारात्मक भावनेने अन्य।अधिकारी, रिक्षा युनियन आदींसह सगळ्या यंत्रणांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.