'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:50 PM2021-12-21T21:50:24+5:302021-12-21T21:51:34+5:30

'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.'

Take steps to de-pollute Ulhas river says jayant patil | 'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

Next

कल्याण- उल्हास नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावित. तसेच उल्हास नदी काठालगत मोहने आणि म्हारळ येतील अतिक्रमणे हटविण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेसह ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंत्रलयात पार पडलेल्या बैठकीत दिल्या.

उल्हास नदी पात्रात रासायनिक कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत आहे. तसेच सांडपाणी मल मूत्र नदी पात्रत प्रक्रिया न करता सोडले जात आहे. नदीपात्रत अतिक्रमणं झाली आहेत. या स्वरुपाच्या तक्रारी जागरुक नागरीक आणि सामाजिक संस्थांकडून जलसंपदा मंत्री पाटील यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव बसवंत स्वामी होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री पाटील यांनी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेने अतिक्रमणे निश्चीत करावीत. नदीलगत व नदीपात्रात बांधकामे करणाऱ्याना नोटिसा बजाविण्यात याव्यात. 

ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. नदीत मिसळत असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशी सूचना दिली आहे. एनआरसी कंपनीने उभारलेला जलबंधारा हा जीर्ण झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी, असेही पाटील यांनी सांगितले. 

या बैठकीस नदी प्रदूषण रोखण्यासठी अनेक वेळा प्रदीर्घ काळ उपोषण करणारे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, सामाजीक कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे आदी उपस्थीत होते.
 

Web Title: Take steps to de-pollute Ulhas river says jayant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.