कोरोना रुग्ण कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:20 PM2021-06-30T17:20:17+5:302021-06-30T17:21:23+5:30

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. गरज भासल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी.

Tata Amantra covid Care Center closed patients numbers decreases | कोरोना रुग्ण कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद

कोरोना रुग्ण कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद

Next
ठळक मुद्देमुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती.गरज भासल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी.

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर १ जुलैपासून बंद करण्यात आले असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढल्यास हे सेंटर पुन्हा सुरु केले जाईल असेही पाटील यांनी नमूद केले.
महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव मार्च 2०२० मध्ये सुरु झाला. महापालिकेकडे दोन बडी रुग्णालये आणि १५ हेल्थ सेंटर होते. मात्र  पुरेसा डॉक्टर, नर्सचा स्टाफ नसल्याने त्याठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार कसे करायचे असा प्रश्न होता.

जंबो कोविड सेंटर लगेच तातडीने उभारणो शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी टाटा आमंत्रा या बड्या गृहसंकुलात कोविड केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी महापालिकेस दिली. १ एप्रिल २०२०  पासून टाटा आमंत्रा येथे कोविड केअर सेंटर सुरु झाले. या कोविड सेंटरची क्षमता ३ हजार रुग्णांवर उपचार करण्याची होती.  गेल्या वर्षभरात एका दिवसात २५०० रुग्ण उपचार घेत होते. हा या कोविड सेंटरचा उच्चंक ठरला. महापालिका हद्दीतील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोविड केअर सेंटरची कामगिरी मोलाची ठरली. दिवसाला दोन हजार रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि राहण्याची उत्तम सोय ती स्वतंत्र फ्लॅटमध्ये केली होती. उद्यापासून हे कोविड सेंटर बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर चालविले जाणार आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर सुरु केले जाईल असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

तिसरी लाट पाहता रुक्मीणीबाई रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात येणार आहे. त्याठिकाणचा प्रसूती विभाग वसंत व्हॅली येथील सुतिका गृहात स्थलांतरीत केला जाणार आहे. उद्यापासून वसंत व्हॅली येथे प्रसूतीसाठी महिलाना पाठविण्यास सुरुवात केली जाणार आहे. जोर्पयत हे सगळ्य़ाना ज्ञात होत नाही. तोर्पयत तातडीची प्रसूतीची केस आल्यास ती रुक्मीणीबाई रुग्णालयात केली जाईल. टाटा आमंत्रा कोविड  केअर सेंटर बंद करण्यात आल्याने त्याठिकाणचे १५ डॉक्टर, २७ नर्सेस, ४१ वार्डबॉय हे वसंत व्हॅली आणि रुक्मीणीबाई रुग्णालयात शिफ्ट केले जाणार आहेत.

कोरोना सद्य स्थिती
कोरोना पॉझिव्हीटी रेट-२.४० टक्के
कोरोना डेथ रेट-१.९० टक्के
रुग्ण बरे होण्याचा रेट-९७.३२ टक्के
आजमितीस दिवसाला अॅन्टीजेन आणि आरटीपीसीर टेस्टचे प्रमाण - ३०००

 

Web Title: Tata Amantra covid Care Center closed patients numbers decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.