शिक्षणमंत्र्यांकडून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा नागरी सत्कार
By पंकज पाटील | Published: April 29, 2023 02:57 PM2023-04-29T14:57:30+5:302023-04-29T14:57:53+5:30
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पुणेरी पगडी आणि मोठा हार घालून घालून सत्कार करण्यात आला.
बदलापूर : कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शिवसेना आणि भाजपच्या वतीने या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा शुक्रवारी बदलापूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पुणेरी पगडी आणि मोठा हार घालून घालून सत्कार करण्यात आला. तर आमदार किसन कथोरे, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह शिक्षक संघटनांनीही ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला बदलापूर शहरातील नागरिक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका चांगल्या शिक्षकाचा आपण सन्मान केल्याचे यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. बदलापूरच्या अनिता मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, श्रीधर पाटील, शरद तेली, राजन घोरपडे, संभाजी शिंदे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.