बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेंशन' घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले
By अनिकेत घमंडी | Published: March 14, 2023 04:44 PM2023-03-14T16:44:34+5:302023-03-14T16:53:54+5:30
चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालयच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.
डोंबिवली : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत आज मुंबईत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी मंगळवारी आंदोलन केले. चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालयच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.
आंदोलनात शिक्षण निरीक्षक कार्यालयाच्या अधीक्षक नीता पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले यामध्ये निवेदनात २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व नंतर अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना तसेच २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेंशन' घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले#GovernmentEmployeesStrikepic.twitter.com/ama4wDgL0h
— Lokmat (@lokmat) March 14, 2023
चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालय च्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. जुन्या पेंशन साठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत