शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला
By मुरलीधर भवार | Published: April 17, 2024 08:41 PM2024-04-17T20:41:49+5:302024-04-17T20:42:06+5:30
मुख्याध्यापकावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु.
डोंबिवली- सर्व्हीस बुकात नोंद न झाल्याने शिक्षिकेचे इन्क्रीमेंट होत नव्हते. या कारणावरुन शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यावाद होता. या कारणावरुन शिक्षिकेच्या पतीने दिवा वसई रेल्वे मार्गावरील खारबाव रेल्वे स्टेशनवर मुख्याध्यापकाला गाठले. त्याचावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकील शेख याला अटक केली आहे.
खारबावला एक शाळा आहे. या शाळेत मिनाज ही शिक्षिका कार्यरत आहे. तिची सर्व्हीस बिकात नोंद केली जात नव्हती. त्यामुळे त्यांचे इन्क्रीमेंट केले जात नव्हते. यावरुन तिचा मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात वाद हाेता. हा प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला. तिचा पती शकील याला राग अनावर झाला. शकील याने मुख्याध्यापक भागवत गुरव यांना खारबाव रेल्वे स्टेशनच्या रुळाजवळ गाठले. तूला जीवंत सोडणार नाही असे म्हणत त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले. बेशुद्द अवस्थेत उपचारासाठी कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर शकीलने पळ काढला होता. डोंबिवली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.