AC लोकलमध्ये ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, तुडुंब गर्दी; फॅन, एसी अचानक बंद
By अनिकेत घमंडी | Published: April 19, 2023 10:01 AM2023-04-19T10:01:32+5:302023-04-19T10:02:22+5:30
आधी लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, नंतर एसी-फॅन बंद झाला.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणेरेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.२५ वाजेदरम्यान घडली, त्यामुळे त्या लोकलमधील प्रवासी हैराण झाले. लोकल ठाणे स्थानकात आल्यापासून १५ मिनिटं झाली पण सुरू झालेली नाही, आधी लोकलचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर पुन्हा बंद झाल्यावर उघडत नसून एसी बंद, फॅन बंद अशी गंभीर अवस्था झाली. आधीच लोकल खचाखच भरली असल्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्याची प्रतिक्रिया त्या लोकल मधील प्रवासी सुरजित सिंग राजपूत यांनी दिली.
अचानक लोकलचे दरवाजे उघडून बंद. एसी-फॅनही झाले बंद. प्रवाशांची प्रचंड गैरसोय (व्हिडीओ- अनिकेत घमंडी) pic.twitter.com/q4CRV5FfKL
— Lokmat (@lokmat) April 19, 2023
ते म्हणाले।की, लोकल वेळेत आली नाही आली तर अशी गडबड झाली असून प्रवासी हैराण झाले आहेत. महिला, युवक, युवती विद्यार्थी तसेच हजारो चाकरमनी त्या लोकल मधून प्रवास करत असून रेल्वेच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रवासी हैराण असून लोकल फलाटमध्ये असूनही दरवाजे बंद असल्याने काही करता येत नसून फॅन, एसी।सुरू करा आणि मोकळा श्वास घेऊ द्या अशी ओरड करत संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका बिघाड काय झाला, कधी लोकल सुरू होणार याबाबतची माहिती न मिळाल्याने प्रवासी अधिक संतापले असल्याचे सांगण्यात आले. लोकल डब्यातील स्पीकर वरून रेल्वेने तातडीने घडल्या घटनेची माहिती, देऊन प्रवाशांना सतर्क करायला हवे होते, पण तसे न झाल्याने अशा सुविधा नसून नसल्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली.