लॅण्डस्केप डिझाईन स्पर्धेत मृणमयी बंटे प्रथम तर द्वितीय पारितोषिक तेजस शिरोडेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 05:16 PM2021-11-14T17:16:06+5:302021-11-14T17:16:18+5:30

डोंबिवलीतील शिवम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते बंटे यांना १५ हजार रुपये तर शिरोडे यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले गेले

Tejas Shirode wins first and second prizes in Landscape Design Competition | लॅण्डस्केप डिझाईन स्पर्धेत मृणमयी बंटे प्रथम तर द्वितीय पारितोषिक तेजस शिरोडेला

लॅण्डस्केप डिझाईन स्पर्धेत मृणमयी बंटे प्रथम तर द्वितीय पारितोषिक तेजस शिरोडेला

Next

कल्याण  - इंडीयन इन्स्टीटय़ूट ऑफ आर्किटेक्ट संस्थेच्या कल्याण डोंबिवली सेंटरचा काल ३१ वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त लॅण्डस्केप डिझाईनची एक आगळी वेगळी स्पर्धा एमएमआर रिजनमधील आर्किटेक्ट विद्यार्थ्यांकरीता आयोजित केली होती. यास्पर्धेत दोन विद्यार्थी आर्किटेक्टने बाजी मारली आहे. पहिले मृणमयी बंटे आणि दुस:या क्रमांकाचे पारितोषिक तेजस शिरोडे यांनी पटकाविले आहे.

डोंबिवलीतील शिवम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते बंटे यांना १५ हजार रुपये तर शिरोडे यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले गेले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिरीष नाचणे, केशव चिकोडी, कार्यकारी पदाधिकारी संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थइत होते. संस्थेच्या धनश्री भोसले यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. एमएमआरडीए रिजनमधील आर्किटेक्टच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. ३३ जणांनी त्यात सहभाग नोंदविली. अंतिम फेरीत १० जणांमधून पहिले आणि दुसरे पारितोषिकासाठी निवड केली गेली. लॅण्डस्केपमधील दिग्ग्ज असलेले वास्तू विशारद राजू प्रधान, स्वाती डिके, सुवर्णा साठे यांनी स्पर्धेच्या परिक्षकांचे काम पाहिले. कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी विविध प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. कांचन गाव येथे एका विकासकाला आरक्षीत भूखंडावर उद्यान विकासीत करण्याचे सरकारने बंधनकारक केले होते. २५०० चौरस मीटर जागेत हे उद्यान विकसीत करायचे असल्याने ते अन्य उद्यानाप्रमाणो विकसीत करण्यापेक्षा त्यासाठी एक वेगळी स्पर्धा घेऊन ते विकसीत करण्याचा विचार संस्थेने ३१ व्या वर्धा दिनानिमित्त स्पर्धा घेऊन केला आहे. कांचन गावमध्ये विकसीत केले जाणारे उद्यान हे मोठे आहे. तशा प्रकारचे उद्यान कल्याण डोंबिवलीत कुठेही नाही. त्यामुळे या उद्दानात झाडे कोणती असतील. कशा प्रकारची असतील. ज्येष्ठ नागरीक आणि मुलांसाठी काय सेक्शन विकसीत केले जातील याचा विचार केला जाणार आहे. केवळ चालण्यासाठी ट्रॅक आणि मुलांसाठी खेळणी अशा ढोबळ पद्धतीने ते विकसीत न करता चांगल्या प्रकारे स्मार्ट सिटीला साजेसे उद्यानच विकसीत केले जाईल याकडे अध्यक्ष नाचणे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Tejas Shirode wins first and second prizes in Landscape Design Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.