डाेंबिवलीवरून २० मिनिटांत ठाणे गाठता येणार; मे महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:24 AM2023-03-30T10:24:32+5:302023-03-30T10:24:40+5:30
या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन आवश्यक हाेते. काेराेनाकाळात या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला.
डाेंबिवली : माेठा गाव-माणकाेली या खाडीपुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १५ टक्के कामही मार्गी लागल्यावर हा पूल मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पुलामुळे डाेंबिवलीहून ठाणे अवघ्या २० मिनिटांत गाठता येईल.
या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन आवश्यक हाेते. काेराेनाकाळात या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला. काेराेनानंतर पुलाच्या कामाला वेग देण्यात आला. पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे वारंवार पाठपुरावा करून बैठका घेतल्या. त्याचबराेबर स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पुलाच्या कामाकरिता लागणारी जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुकर करण्यासाठी पालिका नगररचना विभागातर्फे शिबिरे आयाेजित केली.
फेब्रुवारी २०१७ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मे महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.या पुलामुळे डाेंबिवलीवरून ठाणे शहरात येण्यासाठी लागणाऱ्या २७ किलाेमीटरच्या फेऱ्यातून नागरिकांची सुटका हाेणार आहे. तसेच वेळ आणि इंधनाची बचत हाेणार आहे. हाच रस्ता कल्याण रिंग राेड व एराेली-काटई रस्त्याला जोडणार. डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मुंब्रा, नवी मुंबईतील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.