ठाणे: शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदमसह 15 जणांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:13 PM2022-06-28T22:13:46+5:302022-06-28T22:14:08+5:30
डोंबिवली- एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह 15 जणांनी शिवसेना पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ...
डोंबिवली-एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह 15 जणांनी शिवसेना पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
कदम यांच्यासह सागर दबे, दीपक भोसले, राजेश मुगणोकर, प्रथमेश खरात, अनिस निकम , स्वप्नील वाणी, सागर इंगळे, क्षितीज माळवदकर, विशाल टोपले, कौस्तूभ फडके, निखील साळूंखे, करण कोतवाल, ओंकार कदम, महेश बुट्टे यांनी राजीनामा दिल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता. एकनाथ शिंदे यांना अनैसर्गिक आघाडीमुळे शिवसेनेवर भविष्यात संकट येणार याची चाहूल होती. ही संकटाची चाहूल ओळखून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार पुढे नेण्यासाठी शिंदे यांनी जे पाऊल उचलले आहे. त्याला शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे राज्याच्या हिताचा जो काही निर्णय घेतील. तो आमच्या हिताचा असल्याने आमची पुढील वाटचाल त्यांच्यासोबत असेल असे कदम यांनी स्पष्ट केले आहे.