…म्हणून डोंबिवलीच्या आरपीएफ कर्मचाऱ्याचं होतंय कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 09:49 PM2021-11-08T21:49:17+5:302021-11-08T21:51:06+5:30

सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात एक संवेदनशील प्रसंग घडला.

thats way the RPF staff of Dombivli is appreciated | …म्हणून डोंबिवलीच्या आरपीएफ कर्मचाऱ्याचं होतंय कौतुक 

…म्हणून डोंबिवलीच्या आरपीएफ कर्मचाऱ्याचं होतंय कौतुक 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

डोंबिवली: सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात एक संवेदनशील प्रसंग घडला. लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. यावेळी कर्तव्यावर असणा-या आरपीएफच्या कर्मचा-यांनी खबरदारी व संवेदनशील भान  राखत या महिलेला लगेच रुग्णालयात दाखलं केलं. या महिलेनं एका गोंडस मुलाला  जन्म दिला असून आई आणि बाळ  दोघेही सुखरूप आहेत. 
       
सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मुंबईकडे जाणा-या लोकलमधून प्रवास करणाऱ्या सना अन्सारी या महिलेला डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रसूती वेदना सुरू झाल्या. याबाबतची माहिती एका प्रवाशाने स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या  महिला कॉन्स्टेबल दुर्गेश आणि भावना यांनी सनाला लोकलमधून उतरवलं. त्यानंतर रिक्षाने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेलं. तिथे डॉ काजल शहा यांच्या देखरेखीखाली सनाची प्रसूती केली.
 

Web Title: thats way the RPF staff of Dombivli is appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.