एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर

By अनिकेत घमंडी | Published: December 5, 2023 05:43 PM2023-12-05T17:43:23+5:302023-12-05T17:43:58+5:30

पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर "मिशन २०२४" च्या दृष्टीने महायुतीची आक्रमक रणनीती पाहायला मिळत आहे.

the appointment of Divisional Liaison Leader and Lok Sabha Inspector has been announced By the order of Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर

एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर

डोंबिवली: शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी निर्णायक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या नेमणुकांमध्ये विद्यमान मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मंगळवारी दिली.

शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत विभागीय संपर्क नेते आणि जिल्हानिहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्षांमध्ये समन्वय राखून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखली जाणार आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर "मिशन २०२४" च्या दृष्टीने महायुतीची ही आक्रमक रणनीती समजली जात आहे. 

विभागीय संपर्क नेत्यांची नेमणूक करताना कोकण विभागाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उद्योगमंत्री  उदय सामंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्यासाठी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच मुंबई शहर व उपनगरसाठी सिद्धेश कदम व  किरण पावसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांसाठी आनंदराव जाधव यांची तर जालना, संभाजीनगर, परभणी व बीड जिल्ह्यांसाठी अर्जुन खोतकर आणि उत्तर महाराष्ट्रात मोडणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी विभागीय संपर्क नेते म्हणून विजय शिवतारे व पुणे, सोलापूर जिल्ह्यांसाठी संजय मशीलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी दीपक सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांसाठी विलास पारकर आणि वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांसाठी  विलास चावरी यांची निवड करण्यात आली आहे. 

जिल्हा निहाय लोकसभा निरीक्षकांची नेमणूक करताना नंदुरबार जिल्ह्यासाठी राजेश पाटील, धुळे जिल्ह्यासाठी  प्रसाद ढोमसे, जळगाव जिल्ह्यासाठी  सुनील चौधरी, रावेर जिल्ह्यासाठी विजय देशमुख, बुलढाणा जिल्ह्यासाठी  अशोक शिंदे, अकोला जिल्ह्यासाठी भूपेंद्र कवळी, अमरावती साठी  मनोज हिरवे, वर्धा जिल्ह्यासाठी  परमेश्वर कदम, रामटेक जिल्ह्यासाठी  अरुण जगताप, नागपूर साठी अनिल पडवळ, भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी आशिष देसाई, गडचिरोली-चिमूर जिल्ह्यासाठी  मंगेश काशीकर, चंद्रपूर साठी  किरण लांडगे, यवतमाळ-वाशिम जिल्ह्यासाठी  गोपीकिशन बजौरीया, हिंगोली जिल्ह्यासाठी सुभाष सावंत, नांदेड जिल्ह्यासाठी दिलीप शिंदे, परभणी जिल्ह्यासाठी  सुभाष  साळुंखे, जालना जिल्ह्यासाठी विष्णू सावंत, छत्रपती संभाजीनगर साठी अमित गिते, दिंडोरी जिल्ह्यासाठी सुनील पाटील, नाशिकसाठी  जयंत साठे, पालघर जिल्ह्यासाठी रवींद्र फाटक, भिवंडी साठी प्रकाश पाटील, रायगडसाठी श्री मंगेश सातमकर, मावळ साठी विश्वनाथ  राणे, पुणे जिल्ह्यासाठी किशोर भोसले, शिरूर साठी अशोक पाटील, नगर जिल्ह्यासाठी अभिजित कदम, शिर्डी साठी राजेंद्र चौधरी, बीड जिल्ह्यासाठी डॉ. विजय पाटील, धाराशिव जिल्ह्यासाठी रवींद्र गायकवाड, लातूर जिल्ह्यासाठी बालाजी काकडे, सोलापूर जिल्ह्यासाठी इरफान सय्यद, माढा जिल्ह्यासाठी श्री कृष्णा हेगडे, सांगली जिल्ह्यासाठी राजेश क्षीरसागर, सातारा जिल्ह्यासाठी  शरद कणसे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी  राजेंद्र फाटक, कोल्हापूरसाठी उदय सामंत, तर हातकणंगले जिल्ह्यासाठी योगेश जानकर यांची निवड करण्यात आली आहे.   

Web Title: the appointment of Divisional Liaison Leader and Lok Sabha Inspector has been announced By the order of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.