कल्याणच्या वास्तुविशारदकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 07:51 PM2023-01-07T19:51:59+5:302023-01-07T19:52:52+5:30

वास्तुविशारद पाटील हे गेल्या १४ वर्षापासून वास्तुविशारद या क्षेत्रात कार्यरत आहे.

The architect of Kalyan won the National Award | कल्याणच्या वास्तुविशारदकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

कल्याणच्या वास्तुविशारदकाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

googlenewsNext

मुरलीधर भवार

कल्याण - कल्याणचे वास्तुविशारद संदीप पाटील यांना स्पेशल रेकग्नीशन ऑफ वर्क इन पब्लिक डोमेन फॉर पब्लिक इंटरेस्ट अँड अवरनेस प्रेसीडेशियन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. वास्तुविशारदांची संस्था दि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ आर्कीटेक्टस या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. आर. राजू यांच्या हस्ते हा अवॉर्ड पाटील यांना छत्तीगड येथील रायपूर येथील दोन दिवस अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रदान करण्यात आला.

वास्तुविशारद पाटील हे गेल्या १४ वर्षापासून वास्तुविशारद या क्षेत्रात कार्यरत आहे. वास्तू विशारद संस्थेच सक्रिय सदस्य आणि पदाधिकारी आहे. कल्याण डोंबिवलीतील अनेक जनहितांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला आहे. कल्याण शीळ रस्ता चांगला होण्यासाठी त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार या कामात समन्वय साधण्यास न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे रेरा आणि महापलिकेस राज्य सरकारची फसवणूक कशी केली गेली हे प्रकरण माहिती अधिकारात उघड आणले. 

या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची ईडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे बेकायदा बांधकामांचा पर्दाफाश झाला आहे. तसेच विकास कामात आड येणाऱ्या बेकायदा इमारतीविरोधातही त्यांनी वारंवार आवाज उठवून प्रशासनाला बेकायदा इमारती पाडण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या जनहितार्थ कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना राष्ट्रीय संमेलनात पुरस्कार देऊन गौरविले आहे.
 

Web Title: The architect of Kalyan won the National Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.