फन, फिटनेस आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार; सुप्त कलागुण आणि कौशल्यांना मिळाला वाव
By प्रशांत माने | Published: January 28, 2024 04:26 PM2024-01-28T16:26:27+5:302024-01-28T16:28:31+5:30
फन, फिटनेस आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार या निमित्ताने पाहायला मिळाला.
डोंबिवली: रोटरी क्लब ॲाफ डोंबिवली रिजेन्सी आणि डोंबिवली सौदामिनी तर्फे सलग दुसऱ्या वर्षी डोंबिवली पुर्व येथील फडके रोडवरील अप्पा दातार चौक येथे रविवारी ‘हॅपी स्ट्रीट’ हा उपक्रम आयोजीत करण्यात आला होता. फन, फिटनेस आणि नृत्याचा एकत्रित आविष्कार या निमित्ताने पाहायला मिळाला. सुप्त कलागुण आणि कौशल्यांना वाव मिळण्याच्या दृष्टीने या उपक्रमाच्या निमित्ताने ठिकठिकाणी उपलब्ध झालेल्या व्यासपिठावर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तरूण-तरूणी, नर्तक, गायक या सगळयांनीच उस्फुर्त सहभाग घेतला होता.
रोटरी डोंबिवली रिजन्सी चे अध्यक्ष रोटेरियन सुमित जगताप आणि रोटरी डोंबिवली सौदामिनीच्या अध्यक्षा रोटेरियन ज्योती नाईक यांचा नेतृत्वाखाली प्रकल्प प्रमुख रोटेरियन सचिन म्हात्रे, अमित देशपांडे, स्मृती खाडीलकर व सुप्रिया साव यांच्यावतीने हा उपक्रम राबवला गेला. यात झुंबा, गाणी, नाच, स्केटिंग, लाईव म्युझिक प्लेईंग, रांगोळी, ढोल-ताशा, योगा, फ्लाईंग डॅपो, जुने खेळ, कराटे आदी विविध प्रकारांद्वारे तमाम लोकांचे मनोरंजन झाले. या उपक्रमात ज्येष्ठ, तरूण नागरिकांसह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनीही सहभागी होत आनंद लुटला. रोटरी इंटरनॅशनल तर्फे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर मिंलीद कुलकर्णी आणि माजी डीस्ट्रीक्ट गव्हर्नर कैलाश जेठानी यांच्यासह अनेक रोटरी पदाधिकाऱी यावेळी उपस्थित होते. रविवारी सकाळी ५ ते १० वाजेदरम्यान हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कालावधीत आप्पा दातार चौक फडके मार्गावरून जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.