आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

By मुरलीधर भवार | Published: August 29, 2022 09:05 PM2022-08-29T21:05:14+5:302022-08-29T21:06:38+5:30

कल्याण दुर्गाडी गणेश घाटावर खाडी किनारी गणेश विसजर्न करण्यासाठी कोन गावातून तसेच उल्हासनगरातून मूर्ती आणल्या जातात.

The commissioner inspected Ganesh Ghat along the bay at Durgadi, and will use drones to control the crowd | आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

googlenewsNext

कल्याण-गणेशोत्सवासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी किल्ले दुर्गाडी खाडी किनारी असलेल्या गणेश घाटाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली आदी उपस्थित होते.

कल्याण दुर्गाडी गणेश घाटावर खाडी किनारी गणेश विसजर्न करण्यासाठी कोन गावातून तसेच उल्हासनगरातून मूर्ती आणल्या जातात. याठिकाणी वाहतूकीची व्यवस्था सुरळित राहावी. विसजर्न प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जावी याची पाहणी आयुक्तांनी आज केली. तसेच घरगूती गणेश विसजर्नासाठी कृत्रि तलावाची व्यवस्था विविध प्रभागात केली आहे. याशिवाय महापालिकेने ऑन कॉल विसजर्नाची व्यवस्थाही केली आहे. पालिकेने पार्किगची व्यवस्था केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे असे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.

दुर्गा माता चौक ते दुर्गाडी गणोश घाट परिसरात विद्युत विभागाकडून १२५ केव्हीचे ३ जनरेटर, एक हजार वॅटचे १२० हॅलाेजन, १२ सीसीटीव्ही कॅमेरे, उद्घाेषणा करण्यासाठी दाेन साऊंड सिस्टीम, १० लाईटिंग टाॅवरची व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून गणेश मूर्ती नेण्यासाठी व परत जाण्याकरीता स्वतंत्र पाेहच रस्ता तयार केला आहे. मंडप, टेबल, खु्र्च्यांसह पिण्याच्या पाण्याची टाकी त्याठिकाणी ठेवली जाणार आहे.
 

Web Title: The commissioner inspected Ganesh Ghat along the bay at Durgadi, and will use drones to control the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.