कल्याण डोंबिवलीतील विकास कामे नव्या महिला आयुक्तांकडून जलदगतीने आणि युद्धपातळीवर केली जातील
By मुरलीधर भवार | Published: November 17, 2023 09:50 PM2023-11-17T21:50:17+5:302023-11-17T21:50:24+5:30
खासदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आपेक्षा
कल्याण- राज्य सरकारच्या विविध योजनांमधून कल्याण डोंबिवलीस विकास निधी प्राप्त झालेला आहे. रस्त्यांची विकास कामे , उड्डाणपूलाची कामे आहेत. कचऱ््याचा प्रश्न सुटणार अशी सर्व विकास कामे जलदगतीने झाली पाहिजेत. नव्या महिला आयुक्तांकडून जलगदगतीने आणि युद्धपातळीवर होतील अशी आम्हाला आपेक्षा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
हिंदूह्रदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त आज कल्याणच्या भगवा तलावा परिसरातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास खासदार शिंदे यांनी अभिवादन केले. या वेळी आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख रवी पाटील, महेश गायकवाड, राजेश मोरे, माजी महापौर वैयजंती घोलप, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी खासदार शिंदे यांनी उपरोक्त आपेक्षा नव्या आयुक्तांकडून केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नव्या आयुक्त डॉ. इंदूरानी जाखड यांची वर्णी लागली आहे. यासंदर्भात खासदार शिंदे यांनी ही आपेक्षा व्यक्त केली. खासदार शिंदे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात प्रथम महिला आयुक्त लाभल्या आहेत. महिलाही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. नव्या आयुक्त जाखड यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात आणि मंत्रालयात काम केले आहे. त्यांच्याकडून कल्याण डोबिवलीच्या विकासाचे चांगले काम होईल याकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनानंतर खासदार शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्व आखून दिले होते. त्यांचे तत्व आणि विचार खऱ््या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे घेऊन जाण्याचे काम करीत आहेत. या सरकारमध्ये नागरीकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत. समाजातील सगळ्या घटनांना न्याय कसा मिळेल अशा स्वरुपाचे काम केले जात आहे.