कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा

By मुरलीधर भवार | Published: May 9, 2023 04:35 PM2023-05-09T16:35:52+5:302023-05-09T16:36:51+5:30

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

The former Chairman of the Standing Committee reviewed the work of Amrit Water Supply Scheme in Kalyan rural areas | कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा

कल्याण ग्रामीण भागातील अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाचा स्थायी समिती माजी सभापतीनी घेतला आढावा

googlenewsNext

कल्याण-कल्याण ग्रामीण भागात स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करीत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले

कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा आणि मानपाडा या गावांमध्ये केंद्र सरकारच्या याेजने अंतर्गत अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. अमृत योजने अंतर्गत प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे. पाणी साठविणारे जलकुंभ उभे राहिल्यावर भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या कल्याण ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने येते. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित केली असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

कल्याण ग्रामीणमधील पाण्याचा प्रश्न येत्या ४ महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही यावेळी याेजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने यावेळी दिली. यावेळी माजी नगरसेवक जालिंदर पाटील , नकुल गायकर , मुकेश पाटील कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे शैलेश कुलकर्णी ,योगेश म्हात्रे , आशु सिंह , मुकेश भोईर स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे, अक्षय गायकर आणि सचीन कासार आदी उपस्थित हाेते.

Web Title: The former Chairman of the Standing Committee reviewed the work of Amrit Water Supply Scheme in Kalyan rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण