पाण्याच्या व्हॉल्ववरील पत्रा तुटल्याने कचऱ्याची गाडी फसली
By प्रशांत माने | Published: August 25, 2022 07:29 PM2022-08-25T19:29:58+5:302022-08-25T19:34:20+5:30
चाक पत्रा तुटून आतमध्ये फसल्याने गाडी बाहेर काढणे अशक्य होते. अखेर जेसीबीच्या सहाय्याने गाडी ओढून बाहेर काढण्यात आली.
डोंबिवली - एकीकडे रस्त्यातील खड्डयांनी वाहनचालक आणि नागरीक बेजार झाले असताना रस्त्यावरील पाण्याच्या व्हॉल्ववरील पत्र तुटून यात केडीएमसीची कचरा वाहून नेणारी आर सी गाडी फसल्याची घटना डोंबिवली पुर्वेकडील सुयोग मंगल कार्यालयासमोर आज सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली.
ही कचऱ्याची गाडी पुर्वेकडील सावरकर रोड, भाजी मार्केट, टाटा लाईन परिसरातील कचरा भरून कल्याणकडे जात होती. त्यावेळी ही घटना घडली. सुदैवाने यावेळी पत्र्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या व्हॉल्वचे नुकसान झाले नाही. अन्यथा मोठया प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली असती. घटनेची माहीती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
चाक पत्रा तुटून आतमध्ये फसल्याने गाडी बाहेर काढणे अशक्य होते. अखेर जेसीबीच्या सहाय्याने गाडी ओढून बाहेर काढण्यात आली. पत्र तुटल्याने त्याठिकाणी आणखीन जाड पत्र्याचे झाकण बसविले जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.