"प्रकृती ठिक नाही, म्हणून मी राजीनामा देत आहे"; NCP नेते जगन्नाथ शिंदे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
By मुरलीधर भवार | Published: February 27, 2023 04:58 PM2023-02-27T16:58:33+5:302023-02-27T17:00:36+5:30
त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष मंजूर करणार की नाही याकडे आता राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
कल्याण - कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळू शकत नाही, असे कारण त्यांनी दिले आहे. त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष मंजूर करणार की नाही याकडे आता राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जगन्नाथ शिंदे यांचे सामाजिक काम मोठ आहे. त्यांच्याकडून टिटवाळ्य़ात एक सैनिकी शाळा चालविली जाते. त्याचबरोबर ते ऑल इंडिया केमिस्ट ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष आहे. त्यांच्या कामाचा व्याप मोठा आहे. राष्ट्रवादीचे ते जूने कार्यकर्ते असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले होते. विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत संपल्यावर कल्याणमधील राष्ट्रवादीला उभारी देण्याकरीता त्यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धूरा २०२० मध्ये देण्यात आली. त्यावेळी त्यांनी पक्षाकडे समन्वयक पद द्या अशी मागणी केली होती. मात्र पक्षाने जिल्हाध्यक्ष पद दिले. जिल्हाध्यक्ष पद उमेश बोरगांवकर यांना द्यावे असे शिंदे यांनी पक्षाला सूचविले होते. मात्र पक्षाने जिल्हाध्यक्ष पदासाठी शिंदे यांचाच विचार केला. जिल्हाध्यक्ष पदाचे काम पाहतान शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले. तसेच कल्याण शिवाजी चौकात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु केले.
शहरातील बीएसयूपीचे घरे, उल्हास नदी प्रदूषणाचा विषय, रस्ते विकास या विषयी प्रशासनाचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या विविध चुकीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलने केली. आत्ता त्यांची प्रकृती ठिक नसल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाचे काम पाहणो शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाने त्यांचा राजीनाम्यावर अद्याप विचार केला नसला तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या पदाधिका:यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.