भर चौकात बंदूक घेऊन फिरत होता सराईत गुन्हेगार
By मुरलीधर भवार | Published: May 11, 2024 11:19 PM2024-05-11T23:19:33+5:302024-05-11T23:19:49+5:30
तीन मिनिटात पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
कल्याण-लोकसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एकीकडे राजकीय र’ली सुरु आहे. दुसरीकडे काही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिस सतर्क आहेत. एक तरुण भर रस्त्यात बंदूक घेऊन फिरतोय अशी माहिती मिळताच कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तीन मिनिटांत बंदूक घेऊन फिरणाऱ््यास ताब्यात घेत. त्याच्याकडील बंदूक जप्त केली. केतन शंकर बोराडे असे या आरोपीचे नाव आहे. हा सराईत गुन्हेगार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राजकीय प्रचार सुरु आहे. दुसरीकडे भरारी पथके कामाला लागली आहेत. निवडणूकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पाेलिसांनी कंबर कसली आहे. सर्व ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे. गर्दीचा फायदा घेत कोणी काही गुन्हा करु नये याासठी पोलिस डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहे. कल्याण पस्चिमेतील राममारुती मंदिर परिसरात एक तरुण बंदूक घेऊन फिरतोय असी माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सचिन साळवी त्यांच्या सहकारी पोलिसांसोबत माहिती मिळालेल्या घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी पोहचताच पोलिासांना पाहून बंदूक घेऊन फिरणारा तरुण पळ काढू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग केला. त्याला पकडले.
केतन शंकर बाेराडे असे या व्यक्तिचे नाव आहे. केतन विरोधात गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहे. एका लूटीच्या प्रकरणात त्याला यापूर्वी शिक्षा झाली आहे. त्यानंतर तो जेलमधून सूटन आला. केतन बोरोडे याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याजवळील सापडलेली बंदूक ही गावठी कट्टा आहे. एका गावठी कट्ट्यासह एक म’गझीन आणि तीन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. केतन हा बंदूक कशासाठी फिरत होता. याचे उत्तर तपासातून समोर येणारआहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.