वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध

By मुरलीधर भवार | Published: April 27, 2023 07:18 PM2023-04-27T19:18:15+5:302023-04-27T19:18:43+5:30

मुलीच्या पालकांनी पाेलिसांसह त्या पती पत्नीचे आभार मानले आहेत.

The missing 3-year-old girl was found within three hours | वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध

वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध

googlenewsNext

कल्याण-पती पत्नीने आणि कल्याण महात्मा फुले पाेलिसांनी सतर्कता दाखविल्याने वाट चुकलेल्या तीन वर्षांच्या मुलीचा अवघ्या तासात शाेध लागला. तेव्हा कुठे मुलीच्या आई वडिलांचा जीव भांड्यात पडला. मुलीच्या पालकांनी पाेलिसांसह पती पत्नीचे आभार मानले आहेत.

काल रात्री ९ वाजताच्या सुमारास रामबागेत राहणारे आेमकार खत्री आणि त्याचा मित्र कल्याण मुरबाड राेडवरील सरकारी विश्रामगृहाच्या जवळ फेरफटका मारत हाेते. यावेळी तीन वर्षाची मुलगी रडताना दिसली. त्यांनी आजूबाजूला चाैकशी केली. मात्र त्या मुलीला काेणी आेळखत नव्हते. ही मुलगी घरातून हलविली असावी. अथवा तिच्या आई वडिलांपासून तिची ताटातूट झाली असावी हा विचार करीत खत्री यानी उचलून घेत महात्मा फुले पाेलिस ठाणे गाठले. मात्र मुलीचे रडणे काही थांबत नव्हते. आेमकारने त्याच्या पत्नीला बाेलावून घेतले. आेमकार, त्याची पत्नी आणि मित्र हे तिघेही त्या मुलीला घेऊन पाेलिस ठाण्यात हाेते. घडला प्रकार त्यांनी पाेलिसांना सांगितला. पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक हाेनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला.

साेशल मिडियावर मुलीचे फाेटाे व्हायरल करण्यात आले. मुलीच्या आई वडिलांना शाेधण्यात पाेलिसाना यश आले. तिच्या आई वडिलांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. मुलीला पाहून त्याचे डाेळे पाणावले. पाेलिसानी मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले. मुलीचे नाव राेशनी हाेते. मुलीचे आई वडिल कल्याण पश्चिमेतील मॅक्सी ग्राऊंडनजीक फुगे विकण्याचे काम करतात. फुगे विकत असताना मुलगी शेजारी खेळत हाेती. खेळता खेळता ती मुरबाड राेडवर गेली. या दरम्यान आेमकारने तिला पाहिले. म्हणून ती पाेलिसांच्या मदतीने आई वडिलांपर्यंत पाेहचली. मुलीच्या आई वडिलांनी पाेलिसांसह खत्री पती पत्नी आणि त्यांचा मित्र यांचे आभार मानले.
 

Web Title: The missing 3-year-old girl was found within three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.