एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी
By मुरलीधर भवार | Published: March 16, 2023 06:02 PM2023-03-16T18:02:58+5:302023-03-16T18:15:11+5:30
एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली.
कल्याण : मोहने आंबिवलीनजीक बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या कामगारांना अद्याप त्यांची देणी मिळालेली नाही. त्यामुळे अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या. तर अनेकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांची देणी देण्यासंदर्भात सरकारने सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे.
एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली. कंपनी 2क्क्9 साली बंद करण्यात आली. तेव्हापासून कंपनीतील कामगारांना त्यांची थकीत देणी दिली गेलेली नाही. दरम्यान कंपनीची 425 एकर जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली. कंपनी कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनलकडे न्याय प्रविष्ट आहे. कामगारांनी आंदोलने केली आहेत. मात्र त्यांची देणी अद्याप मिळालेली नाही.
कामगारांच्या आंदोलनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्यक्ष भेट देऊन कामगारांच्या पाठीसी असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने कामगार आणि कंपनी यांच्या सुवर्णमध्य साधून एनआरसी कंपनीच्या कामगारांची देणी देण्यावर तोडगा काढावा अशी मागणी आमदार भोईर यांनी अधिवेशनात केली आहे.
दरम्यान कल्याण पश्चिमेत बाजारपेठ, खडकपाडा, महात्मा फुले ही तीन पोलिस ठाणी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांची कार्यालये आहे. स्टेशन परिसरातील महात्मा फुले पोलिस ठाणो खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. सध्या सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आणि वाहतूक पोलिस नियंत्रण उपायुक्त आणि अधिकारी वर्गाचे कार्यालय एका ठिकाणी आहे. सध्याची इमारत जीर्ण झाली आहे. दोन कार्यालये तर चाळवजा वास्तूत आहे. त्या वास्तूही जिर्ण झालेल्या आहे. त्याच जागेत एकाच ठिकाणी सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक नियंत्रम शाखा आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत उभारली जावी. त्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी देखील आमदार भोईर यांनी अधिवेशनात केली आहे.
आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाणी प्रश्नावर उठविला आवाज
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नागरीकरण होत असल्याने पाण्याची समस्या उद्धवते. पाणी टंचाई विषयी लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांकडून मला विचारणा केली जाते. मात्र अधिकारी वर्गाकडून ठराविक उत्तरे देऊन नागरीकांची बोळवण केली जात असल्याचा मुद्दा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. तसेच कल्याणसाठी पाणी पुरवठा योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.