'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात 

By मुरलीधर भवार | Published: July 19, 2024 06:52 PM2024-07-19T18:52:48+5:302024-07-19T18:53:06+5:30

कल्याण पूर्वेतील नेतिवली कचोरे, नवी गोविंदवाडीटेकडी परिसरात नागरी वस्ती आहे. या टेकडीवरील १४० नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.

The MNS MLA extended a helping hand to those six families  | 'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात 

'त्या' सहा कुटुंबांना मनसे आमदारानं दिला मदतीचा हात 

कल्याण - पावसाळ्यात कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दोन घरे कोसळली. ही कोसळलेली घरे अन्य चार घरावर पडली. त्यामुळे सहा घरांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली. ही कुटुंबे गरीब असल्याने घर पुन्हा कसे उभारायचे हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मनसे आमदार राजू पाटील यांनी सहा नागरीकांना घर बांधण्याकरीता आर्थिक मदत केली आहे.

कल्याण पूर्वेतील नेतिवली कचोरे, नवी गोविंदवाडीटेकडी परिसरात नागरी वस्ती आहे. या टेकडीवरील १४० नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना स्थलांतरीत करण्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसापूर्वी कचोरे येथील टेकडीचा भाग खचला होता. त्याठिकाणी एक भला मोठा दगड खाली आला हाेता. त्यानंतर गुरुवारी दुपारी नेतिवली टेकडीवरील अनंत पवार यांच्या घराचा भाग कोसळला. त्यांच्या घराचा भाग अन्य घरांवर कोसळल्याने सहा घरांचे नुकसान झाले होते. या घटनेची गंभीर दखल आमदार पाटील यांनी घेतली. ज्या घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये सुरेश चव्हाण, अनंत पवार, हरीलाल भारद्वाज, काशीराम मालुसरे , दत्तात्रय पांचाळ, सुरेश भोसले यांच्या घरांचे नुकसान झाल्याने या सहा जणांना घर बांधण्याकरीताआमदार पाटील यांनी आर्थिक मदत दिली आहे. मनसेचे पदाधिकारी महेंद्र कुंदे यांनी या सहा कुटुंबियांना मदत पोहचविली आहे. घरासाठी मदत मिळाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
 

Web Title: The MNS MLA extended a helping hand to those six families 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.