"जोड मजबूत मात्र तोंड विरुद्ध दिशेला"; मनसे आमदाराने केलं ट्वीट
By मुरलीधर भवार | Published: June 17, 2023 06:06 PM2023-06-17T18:06:20+5:302023-06-17T18:12:00+5:30
मानपाडा पोलीस ठाण्यात भाजपचे नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यावर भाजपने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
कल्याण- जोड मजबूत आहे. मात्र तोंड विरुद्ध दिशेला आहे. काय मजबूरी असेल? कधी कधी जाहिरातींचे अर्थ कळत नाहीत बुवा अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे केली आहे. या ट्वीटच्या खाली विशेष सूचना असे लिहून कृपया या शंकेचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न करु नये असे कंसात म्हटले आहे. त्याखाली फेविकॉलच्या जाहिरातीचे चित्र जोडले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात भाजपचे नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यावर भाजपने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तसेच वरिष्ठ पोलिस निरिक्षकाच्या विरोधात कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची ईडी चौकशी करण्याची मागणी केली. या सगळ्यात शिवसेनेकडून सहकार्य मिळत नसल्याने कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने मंजूर केला. त्यानंतर खासदारांनी खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे.
जोड 'मजबूत' आहे आणि तोंड 'विरुद्ध' दिशेला . काय 'मजबूरी' असेल ? कधी कधी जाहिरातींचे अर्थ काही कळत नाही बुवा.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 17, 2023
(वि.सू.: कृपया ह्या शंकेचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये.) #advertisement#doubtspic.twitter.com/fv9v9hMSsT
उमेदवार कोण ते सांगा असे स्पष्ट केले. या सगळ्या वादानंतर मुख्यमंत्री, उपमुखयमंत्री आणि खासदार यांच्या बैठकीत वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज कल्याणमधील लोकग्राम पादचारी पूलाच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप आमदार गणपत गायकवाड हे उपस्थित होते. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित नव्हते. त्याचबरोबर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे हे देखील आले नाहीत. त्यांना पूर्वनियोजित बैठक असल्याने ते हजर नव्हते. कार्यक्रम कल्याणचा असल्याने कार्यक्रमात भाजपचे आमदार पदाधिकारी उपस्थित होते. मात्र याचाच धागा पकडत मनसे आमदार पाटील यांनी टीकात्मक ट्वीट केले आहे.