बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:57 PM2022-05-09T19:57:22+5:302022-05-09T20:28:03+5:30

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या.

The petitioners will go to the Supreme Court, rejecting the multi-member system of elections | बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार

बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार

Next

कल्याण - राज्यातील महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली. महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, निवडणुका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. निवडणूका कोणत्या आणि कशाप्रकारे घ्याव्यात याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र, राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये त्रिसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्दबातल ठरविण्यात यावा. कारण, राज्य सरकारला निवडणूकीसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तसेच, न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, मागच्याच आठवड्यात येत्या पंधरा दिवसात निवडणुका घेण्याच्या तारखेची घोषणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या सगळया पार्श्वभूमीवर पाटील यांच्यासह सात जणांच्या याचिका उच्च न्यायालयाने डिसमिस केल्या आहेत. यासंदर्भातील सुनावणी मागच्या आठवडय़ातील शुक्रवारी झाली. मात्र, सुनावणीची आदेश लेखी प्रत अद्याप हाती आलेली नाही. लेखी प्रत हाती येताच न्यायालयाने आदेश प्रतिमध्ये काय मुद्दे अधोरेखित केले आहे. याचा कायदेशीर अभ्यास करुन याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: The petitioners will go to the Supreme Court, rejecting the multi-member system of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.