पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 08:18 AM2024-11-05T08:18:59+5:302024-11-05T08:19:23+5:30

Dombivli News: भाऊबीजनिमित्त खरेदी केलेल्या वस्तूंची रिक्षामध्ये विसरलेली बॅग काही तासातच शोधून महिलेला सुपुर्द करीत एक प्रकारे मानपाडा पोलिसांनी भाऊबीजेची भेटच दिली. 

The police also found a bag lost in a rickshaw in Dombivli and gave it to a woman | पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून

पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून

 डोंबिवली - भाऊबीजनिमित्त खरेदी केलेल्या वस्तूंची रिक्षामध्ये विसरलेली बॅग काही तासातच शोधून महिलेला सुपुर्द करीत एक प्रकारे मानपाडा पोलिसांनी भाऊबीजेची भेटच दिली. 

अंबरनाथ पश्चिमेला सर्वोदयनगर येथे राहणाऱ्या रोहिणी चव्हाण या रविवारी भाऊबीजेनिमित्त डोंबिवली रेल्वेस्थानक येथून सागाव येथे रिक्षाने  जात होत्या. यावेळी खरेदी केलेल्या वस्तूंची एक बॅग नकळत त्या रिक्षातच विसरल्या. याबाबत त्यांनी तातडीने मानपाडा पोलिस ठाणे गाठत बॅग हरविल्याची तक्रार दिली. पोलिस नाईक यल्लाप्पा पाटील व पोलिस शिपाई घनश्याम ठाकूर यांनी तक्रारीची तातडीने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अवघ्या तीन तासाच्या आत संबंधित रिक्षा आणि रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्यांनी रिक्षात विसरलेली बॅग ताब्यात घेत महिलेला सोपवली. सहायक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या हस्ते महिलेला ही बॅग सुपुर्द करण्यात आली.

Web Title: The police also found a bag lost in a rickshaw in Dombivli and gave it to a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.