कल्याण : भर रस्त्यात महिलेची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक
By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2024 15:53 IST2024-01-24T15:53:11+5:302024-01-24T15:53:32+5:30
त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

कल्याण : भर रस्त्यात महिलेची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक
कल्याण- भर रस्त्यात एका महिलेचा पाठलाग करत तिची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला महात्मा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले. पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
काल रात्रीच्या सुमारास रामबाग परिसरातून एक महिला पायी चालत जात होती. एक इसम महिलेचा पाठलाग करत होता. संधी मिळताच या इसमाने महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केला. आजूबाजूच्या नागरिकांनी या चोरट्याचा पाठलाग करत गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्याला ताब्यात घेतले. पुरुषोत्तम चकोरिया असे या चोरट्याचे नाव आहे. पुरुषोत्तम याने या आधी चोऱ्या केल्यात का ? याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.