सुट्टे पैसे देण्याची समस्या होणार दूर, डोंबिवलीतील रिक्षांना मिळणार क्यूआर कोड
By अनिकेत घमंडी | Published: May 8, 2024 05:38 PM2024-05-08T17:38:23+5:302024-05-08T17:38:59+5:30
रविवारी, १२ मे रोजी सकाळी ९.०० वा. पूर्वेकडील इंदिरा चौक येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
डोंबिवली:डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष क्यूआर कोड मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना सुट्टे पैसे देण्याची अडचण भेडसावू नये यासाठी आणि त्यामुळे रिक्षा चालक मालक यांच्यातील होणारे वाद टाळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी बुधवारी सांगितले.
रविवारी, १२ मे रोजी सकाळी ९.०० वा. पूर्वेकडील इंदिरा चौक येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या डिजिटल क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी डोंबिवलीमधील सर्व रिक्षा चालक डिजिटली सुसज्ज व्हावे यासाठी त्यांना एका खासगी बँकेकडून क्यूआर कोड देण्यात येणार असून, भविष्यात त्याद्वारे रिक्षा भाडे घेणे सहज शक्य होणार आहे. या उपक्रमांतर्गत चार हजाराहून अधिक रिक्षांना ती सुविधा मिळेल असा दावाही त्यांनी केला.