पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस

By मुरलीधर भवार | Published: September 6, 2022 08:59 PM2022-09-06T20:59:19+5:302022-09-06T20:59:45+5:30

३० ऑगस्ट रोजीच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास उल्हासनगरातीले पुजारी ज जग्यासी यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला

The robbery at the priest's house, the car used in the crime came to light kalyan thane | पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस

पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस

Next

कल्याण -उल्हासनगरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लूटणा:या दरोडेखोरांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. या दरोडेखोर टोळीचा म्होरक्या मुंब्रा येथे व्याजाचा धंदा करतो. व्याजावर धंदा करण्यासाठी त्याने ही लूट केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. दरोडेखोर हे गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे पोलिसांच्या जाळयात सापडले आहेत.

३० ऑगस्ट रोजीच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास उल्हासनगरातीले पुजारी ज जग्यासी यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला. दराडेखोरांनी पुजाऱ्याच्या मुलीच्या गळ्य़ावर शस्त्रचा धाक दाखवून घरातील लाखो रुपयांचा ऐवज लूटला. पोलिस दफ्तरी दहा लाख ४० हजार रुपये लुटल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र त्यापेक्षा जास्त रक्कमेचा ऐवज दरोडेखोरांनी लूटल्याचे बोलले जात होते. या दरोडेखोरांच्या शोधासाठी आठ तपास पथके नेमण्यात आली. अखेर या दरोडेखोरांना पकडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या दरोड्यात आरोपींनी जी गाडी वापरली होती. ती गाडी कळंबोळी येथून चोरी करण्यात आली होती. 

पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये या गाडीची माहिती काढली. तेव्हा माहिती समोर आली की, ही गाडी अंबरनाथच्या पालेगावात ठेवण्यात आली. दरोडेखोरांनी पाले गावातून दुस:या गाडीने पसार झाले. गुन्ह्याच्या नंतर एक गाडी सीसीटीव्हीत आढळून आली होती. या गाडीच्या सहाय्याने गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक आरोपींर्पयत पोहचले. या प्रकरणातील चौघे दरोडेखोर जेरबंद करण्यात आले आहेत. यातील मुंब्रा येथे राहणारा अकबर खान हा व्याजावर पैसे देण्याचा धंदा करतो. या धंद्यासाठी त्याने हा दरोडा टाकल्याचे समोर आाले आहे. यातील अन्य आरोपींची नावे आसीफ शेख, शिवलिंग शिकलकर, राहूल सिंग जुनी अशी आहेत. आसीफ हा मुंब्रा येथे राहणारा आहे. अन्य दोन जण हे कल्याण डोंबिवलीत राहत होते. या आरोपींना विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली सूपूर्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 

Web Title: The robbery at the priest's house, the car used in the crime came to light kalyan thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.