रोटरीने केले एका बंधाऱ्याचे विंग वॉलचे काम; नागरिकांची पाणी चिंता मिटली

By अनिकेत घमंडी | Published: May 30, 2024 05:08 PM2024-05-30T17:08:07+5:302024-05-30T17:08:57+5:30

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे जाणीव आश्रम, अंभे गाव, श्री मलंग रोड येथे गुरुवारी एका बंधाऱ्याच्या विंग वॉलचे बांधकाम करण्यात आले.

the rotary club of dombivali mid town constructed wing wall work of an embankment | रोटरीने केले एका बंधाऱ्याचे विंग वॉलचे काम; नागरिकांची पाणी चिंता मिटली

रोटरीने केले एका बंधाऱ्याचे विंग वॉलचे काम; नागरिकांची पाणी चिंता मिटली

अनिकेत घमंडी, डोंबिवली:रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे जाणीव आश्रम, अंभे गाव, श्री मलंग रोड येथे गुरुवारी एका बंधाऱ्याच्या विंग वॉलचे बांधकाम करण्यात आले. यासाठी बंधाऱ्याच्या डाव्या बाजूकडील गाळ जेसिबीने काढून काँक्रीटचे बांधकाम करण्यात आले. या कामामुळे बंधाऱ्यातील पाणी दीर्घकाळ पर्यंत टिकू शकेल व गावातील विहिरींच्या पाणी पातळीत पण वाढ होईल, असे जाणीव आश्रमचे संस्थापक मनोज पांचाळ यांनी सांगितले. यावेळी क्लब अध्यक्ष प्रदीप बुडबाडकर, सचिव श्रीनिवासन मुदलियार यांनी या कामासाठी तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व देणगी देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अनेक सभासद उपस्थित होते.

या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करण्यात येते. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम संस्था हाती घेते.

Web Title: the rotary club of dombivali mid town constructed wing wall work of an embankment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.