तर विकासाचा वेग वाढेल : आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

By सचिन सागरे | Published: March 12, 2024 06:47 PM2024-03-12T18:47:11+5:302024-03-12T18:47:40+5:30

समाजाप्रती आपले योगदान काय असेल समजून घेतले पाहिजे, अर्थसंकल्पविषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातून आजच्या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. जाखड़ यांनी दिली.

The speed of development will increase: Commissioner Dr. Indu Rani Jakhad | तर विकासाचा वेग वाढेल : आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

तर विकासाचा वेग वाढेल : आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

कल्याण : मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी मंगळवारी केले, ‘मेरा युवा भारत’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि प्रेस क्लब, कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ‘महापालिका कामकाज व महापालिकेचा अर्थसंकल्प’ या विषयाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत आयोजित केलेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना डॉ. जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.

यावेळी, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव व उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी, सचिव अतुल फडके तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

समाजाप्रती आपले योगदान काय असेल समजून घेतले पाहिजे, अर्थसंकल्पविषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातून आजच्या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. जाखड़ यांनी दिली. यासमयी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त डॉ. जाखड़ व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहितीपूर्ण उत्तरे दिली.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण विभागाचे उपायुक्त जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, नियमावली, संस्थेची कर्तव्य याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. महापालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी चव्हाण यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक कसे तयार होते, त्यात काय तरतुदी असतात याचे विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केले.

"माय युवा भारत" हे शासनाचं डिजिटल व्यासपीठ असून सर्व युवा वर्गाला एकमेकांना जोडण्यासाठी तुमच्या देण्यासाठी केंद्र शासनाने हे डिजिटल व्यासपीठ तयार केले असून युवा वर्गाने ‘मेरा युवा भारत’ या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन या उपक्रमाचे नोडल ऑफिसर भागवत यांनी आपल्या प्रास्ताविकेत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव आणि उद्यान अधीक्षक महेश देशपांडे यांनी केले.

Web Title: The speed of development will increase: Commissioner Dr. Indu Rani Jakhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.