डोंबिवली क्रिडा संकुलात सहा महिन्यात सुरु होणार टेबल टेनिस कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 04:02 PM2022-01-20T16:02:23+5:302022-01-20T16:02:32+5:30

माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली पाहणी

The table tennis court will start in six months at Dombivli Sports Complex | डोंबिवली क्रिडा संकुलात सहा महिन्यात सुरु होणार टेबल टेनिस कोर्ट

डोंबिवली क्रिडा संकुलात सहा महिन्यात सुरु होणार टेबल टेनिस कोर्ट

googlenewsNext

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेबल टेनिस खेळणा:या खेळाडूंसाठी डोंबिवली क्रिडा संकुलातील जिम्नॅशियम बिल्डींग जागेत टेबल टेनिस कोर्ट सुरु केले जाणार आहे. येत्या सहा महिन्यात खेळाडूंसाठी हे कोर्ट तयार होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

माजी नगरसेवक म्हात्रे यांनी आज क्रिडा संकुलातील टेबल टेनिस कोर्टाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी योगेश म्हात्रे, अशू सिंग आणि अशूतोष येवले आदी उपस्थीत होते. माजी नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, क्रिडा संकुलातील जिम्नॅशियम बिल्डींगची जागा पडून आहे. सध्या या ठिकाणी कोविडचे आरोग्य साहित्य ठेवण्यात आले आहे. या जागेचा वापर नाही. जवळपास पाच हजार चौरस फूटाच्या प्रशस्त जागेत टेबल टेनिस कोर्ट सुरु करण्याची मागणी टेबल टेनिस कोर्ट असोशिएशनने म्हात्रे हे स्थायी समिती सभापती असताना केली होती. त्यावेळी म्हात्रे यांनी टेबल टेनिस कोर्ट सुरु करण्यासाठी महापालिकेच्या अर्थ संकल्पात २५ लाख रुपयांचा निधी ठेवल्याची तरतूद केली होती. मध्यल्या काळात कोविडमुळे हे काम होऊ शकले नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे.

कोरोना काळामुळे खेळाडूंच्या खेळावर बंधने होते. कल्याण डोंबिवलीत राज्य आणि देश पातळीवर टेबल टेनिस खेळणा:या खेळाडूंची संख्या जास्त आहे. कल्याण डोंबिवलीत टेबल टेनिस खेळणा:या खेळाडूंची संख्या जवशपास ६०० इतकी आहे. या खेळाडूंना खाजगी जिमखान्यात फि भरुन सराव करावा लागतो. त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होतो. काही खेळाडू तर मुंबईला सराव करण्यासाठी जातात. ही खेळाडूंची अडचण लक्षात घेता. त्यांच्याकरीता क्रीडा संकुलात टेबल टेनिस कोर्ट सुरु करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीचा विचार करुन जिम्नॅशियम इमारतीच्या जागेत टेबल टेनिस कोर्ट उभारण्यास मंजूरी दिली आहे. आयुक्तांनी या कामाची वर्क ऑर्डरही काढली आहे. या कामावर २५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. येत्या सहा महिन्यात हे काम मार्गी लागणार आहे. त्यानंतर टेबल टेनिस खेळाडू या कोर्टचा मोफत लाभ घेऊ शकतात.

Web Title: The table tennis court will start in six months at Dombivli Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.