शिक्षिकेने जय शिवराय जय श्रीराम लिहिलेले पोस्टकार्ड फाडले; राजकीय पक्षांसह हिंदुत्ववादी संघटनांनी शाळेत घातला गोंधळ
By मुरलीधर भवार | Published: December 9, 2023 06:40 PM2023-12-09T18:40:33+5:302023-12-09T18:40:41+5:30
शिक्षिकेने मागीतली माफी
कल्याण-कल्याणमधील एका नामांकीत शाळेत शिक्षिकेकडून एका विद्यार्थ्यांचे पोस्ट कार्ड फाडल्याच्या आरोपानंतर हिंदूवादी संघटना तसेच भाजप, मनसे, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आक्रमक झाले होते .. या पाेस्ट कार्डवर जय शिवराय, जय श्रीराम असे लिहिले होेते. हिंदूवादी संघटनांनी शाळेत हनुमान चाळीसाचे पठण करत जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत आंदोलन केले . पोस्टकड फाडणारे शिक्षकेला निलंबित करण्याची मागणी केली. अखेर शाळा प्रशासनाने व संबंधित शिक्षिकेने घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत झाले .
कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरातील सेंट थॉमस शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टकार्ड फाडले . या पोस्टकार्डवर जय श्रीराम जय शिवराय असा मजकूर लिहलेला होता .या घटनेनंतर आज बजरंग दल भाजप मनसे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली . संबंधित शिक्षकेने जाणीवपूर्वक हे पोस्टर पाडल्याचा आरोप करत या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली . या दरम्यान या कार्यकर्त्यांनी शाळेत हनुमान चालीसा पठण करत जय शिवराय जय श्रीराम घोषणा दिल्या . त्यामुळे काही वेळेपूरती शाळेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली . भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाशी चर्चा करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. संबंधित शिक्षकेने माफी मागावी अशी मागणी केली .
याप्रकरणी शाळा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली तर संबंधित शिक्षकेने माफी मागितली . त्यानंतर हे प्रकरण शांत झालं . याबाबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी असा प्रकार पुन्हा कुठे घडता कामा नये, गुरु म्हणजे आमचे दैवत आणि जर गुरु असे कृत्य करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही , छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे, घडला प्रकार अयोग्य होता. शाळेने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत . या पुढे अशी कोणती गोष्ट घडणार नाही याची हमी शाळा प्रशासनाने दिली आहे.