जेलमध्ये झाली तिघांची मैत्री, सुटल्यानंतर आखला चोरीचा प्लॅन
By मुरलीधर भवार | Published: March 22, 2023 06:58 PM2023-03-22T18:58:12+5:302023-03-22T18:59:45+5:30
कल्याण पूर्व भागातील सूचकनाका परिसरातील फ्लीपकार्डच्या गाेडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी चाेरी झाली.
कल्याण-त्या तिघांची जेलमध्ये मैत्री झाली. जेलमध्ये त्यांनी चाेरीचा प्लॅन आखला. मात्र चाेरी केलेला माेबाईल त्यांनी सुरु केला आणि ते पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. काेळसेवाडी पाेलिसांनी तिघांपैकी दाेन जणांना अटक केली आहे. एक जण पसार आहे. पसार आराेपीचा पाेलिस शाेध घेत आहेत.
कल्याण पूर्व भागातील सूचकनाका परिसरातील फ्लीपकार्डच्या गाेडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी चाेरी झाली. तीन अज्ञात चाेरच्यांनी गाेडाऊनचे ग्रील वाकवून माेबाईल्स, महागाडे बूट चाेरीस केले. जवळपास सव्वा चार लाखाचा मुद्देमाल चाेरीस गेला. चाेरी करणारे तिन्ही चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले हाेते. काेळसेवाडी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पाेलिस निरिक्षक हरीदास बाेचरे आणि दिनकर पगारे यांच्या पथकाने तपास केला. तिन्ही चाेरटे वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले हाेते.
चाेरट्यांनी चाेरलेल्या माेबाईलचा तपास पाेलिसांनी सुरु केला. याच माेबाईलच्या पाेलिसांनी राहूल पंडित याला जालना येथून अटक केली. राहूल पंडित याच्या अटकेनंतर त्याने सागर शिंदे आणि अमन खान हे दाेघांची नावे सांगितली. पाेलिसांनी सागर शिंदे याला तात्काळ उल्हासनगरातून अटक केली. अमन खान हा अद्याप पसार आहे. ताे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत. राहूल, सागर, अमन या तिघांची जेलमध्ये मैत्री झाली. जेलमधून सुटल्यावर तिघे एकत्रित आले. त्यांनी चाेरीचा प्लॅन आखला. तिघांनी गाेडाऊन फाेडले. हे तिघेही आराेपी हे सराईत गुन्हेगार असून तिघांच्या विराेधात काेळसेवाडी, महात्मा फुले, उल्हासनगर मध्यवर्ती आणि भिवंडीतील नारपाेली आणि तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.