मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला

By अनिकेत घमंडी | Published: January 31, 2024 05:29 PM2024-01-31T17:29:07+5:302024-01-31T17:32:53+5:30

मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे आपले अनुपालन सुनिश्चित केले  असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न कौतुकास पात्र आहे.

The ticket checking staff of the Mumbai division of the Central Railway crossed the Rs one crore revenue mark | मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रवासी तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद शम्स चांद यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात अवैध आणि अनियमित तिकिटांच्या १०,६८६ प्रकरणांमधून दंडाद्वारे १ कोटी रुपयांचा महसूल मिळवून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. हा रेल्वे मंडळाच्या उत्पन्नातील प्रवासी महसूलाचा मोठा वाटा आहे.

मोहम्मद शम्स चांद यांनी यापूर्वी २०२१-२२ या आर्थिक वर्षात सव्वा कोटी रुपयांची महसुली उत्पन्नाची अशीच कामगिरी केली होती.
मुंबई  विभाग हे तिकीट तपासणीच्या निवडक गटात ते सामील होते ज्यामध्ये एकूण १०,४२८ प्रकरणांमधून १,००,०२,८३०/- च्या उत्पन्नासह सुनील नैनानी मुख्य तिकीट निरीक्षक आणि एम एम शिंदे,   मुख्य तिकीट निरीक्षक  यांनी  ११,३६७ प्रकरणांमधून रु. १,०१,३२,८७०/- च्या महसूल   या कर्मचाऱ्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये  प्राप्त केला आहे. 

अशा कामगिरीतून, या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे आपले अनुपालन सुनिश्चित केले  असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न कौतुकास पात्र आहे. या मेहनती व्यक्तींचे सामूहिक प्रयत्न तिकीट तपासणी कार्याप्रती आपली बांधिलकी आणि कार्यक्षमता प्रतिबिंबित करतात.

सर्व बोनाफाइड रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुलभ व्हावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे स्थानकांवर आणि उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमधील नियमितपणे तिकीट तपासणी आपल्या सर्व विभागांमध्ये करत आहे.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सुलभ प्रवास करण्यासाठी  प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Web Title: The ticket checking staff of the Mumbai division of the Central Railway crossed the Rs one crore revenue mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.