कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल
By मुरलीधर भवार | Published: December 14, 2022 06:36 PM2022-12-14T18:36:44+5:302022-12-14T18:37:04+5:30
कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पूल निर्माण करण्याचे काम चालू असून नवीन पुलाचे काम करण्यासाठी कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे .या पार्शवभूमीवर या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
१५ ते २२ डिसेंबर २०२२ रोजी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार असल्याने याकालावधी करीता सदर ररस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे .अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पाेलिस अधिकारी रविंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
काय आहे बदल
- प्रवेश बंद - कल्याण फाटाकडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
- पर्यायी मार्ग - कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
- प्रवेश बंद - कल्याण कडून कल्याण फाटा कड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
- पर्यायी मार्ग - कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही बदलापूर चौक- खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.
मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल
मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.डोंबिवली पूर्व साईबाबा सागाव चौक ते मानपाडा चौक दरम्यान रस्त्याचे खोदकाम करून कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर भागात वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.