कल्याण पूर्वेतील पाणी समस्या डिसेंबर अखेर निकाली निघणार
By मुरलीधर भवार | Published: June 11, 2024 04:29 PM2024-06-11T16:29:51+5:302024-06-11T16:30:20+5:30
पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणी केली. डिसेबर अखेर ही समस्या सुटेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
कल्याण- कल्याण पूर्व परिसरातील खडेगोळवलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे नागरिक पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई बाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र पाणी समस्या जैसे थे आहे. अखेर आज शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांची आज भेट घेतली. पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणी केली. डिसेबर अखेर ही समस्या सुटेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
खडेगोळवली तसेच कल्याण पूर्व ग्रामीण भागातील आशेळे माणेरे ,नांदीवली या परिसरातील नागरीकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा समस्येला सामोरे जावे लागते. या परिसरात अर्धा ते एक तास पाणी सोडले जाते. कधी कधी ते सोडले जात नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या, निवेदन दिली, पाठपुरावा केला मात्र पाणी समस्या कायम आहे. शहरप्रमुख गायकवाड यांनी महापालिका आयुक्त जाखड यांचे भेट घेतली.
पाणी समस्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पाणी कमी दाबाने सोडले जाते त्यामुळे ही समस्या आहे ,पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली. गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले पाण्याच्या कमी दाबाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. कल्याण पूर्व येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पूर्व भागातील पाण्याच्या टाक्यांची कामेही ९० टक्के पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. डिसेंबर महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील . त्यानंतर कल्याण पूर्व भागातील पाणी समस्या निकाली निघेल असे आश्वासन आयुक्तांनी गायकवाड यांना दिले आहे.