ठाणे स्थानकातील फलाट ५ च्या रूंदीमुळे १ लाख प्रवाशांना होईल लाभ, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी केली कामाची पाहणी

By अनिकेत घमंडी | Published: June 1, 2024 02:05 PM2024-06-01T14:05:39+5:302024-06-01T14:05:56+5:30

रेल्वेने ठरवल्यानुसार काम सुरू असून रूळ स्थलांतर आणि फलाट रूंदीचे काम करण्यात आले असून रात्रभरात कामाचा वेग वाढला होता. रेल्वे रुळात उतरून अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.

The width of platform 5 in Thane station will benefit 1 lakh passengers, General Manager, Divisional Managers inspected the work | ठाणे स्थानकातील फलाट ५ च्या रूंदीमुळे १ लाख प्रवाशांना होईल लाभ, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी केली कामाची पाहणी

ठाणे स्थानकातील फलाट ५ च्या रूंदीमुळे १ लाख प्रवाशांना होईल लाभ, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी केली कामाची पाहणी

डोंबिवली: ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५/६ रूंदीकरणाचा फायदा एक लाख प्रवाशांना होणार असून सध्या अरुंद फलाटामुळे प्रवाशांची होणारी घुसमट, प्रचंड गर्दी विभागली जाईल आणि त्यातून सुटसुटीत प्रवास करता येईल असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार।गोयल यांनी शनिवारी ठाणे स्थानकातील फलाट ५/६ च्या कामाची पाहणी केली.

रेल्वेने ठरवल्यानुसार काम सुरू असून रूळ स्थलांतर आणि फलाट रूंदीचे काम करण्यात आले असून रात्रभरात कामाचा वेग वाढला होता. 
रेल्वे रुळात उतरून अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.

त्या सोबतच फलाटातील एस्कलेटर सुविधा आणि पादचारी पुलाच्या पायऱ्यांची रूंदी करता येईल, जेणेकरून सध्या त्या ठिकाणी भेडसावत असलेली चेंगराचेंगरी काही प्रमाणात कमी करता येईल असेही जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी  स्पष्ट केले.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवारी संध्याकाळी ४ पर्यन्त सुरू असलेल्या या ब्लॉकमध्ये पोकलेन आणि अन्य यंत्रणेच्या सहाय्याने रेल्वे रूळ स्लीपर्ससकट हलवण्याचे काम सुरू आहे, त्यानंतर मोठे आरसीसी ब्लॉक टाकून फलाटाची रूंदी वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी तीन सत्रात काम सुरू असून सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत, २५ अधिकारी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

पोकलेनच्या सहाय्याने विशिष्ट असे रेल्वे ट्रॅक स्लीपर्स सकट हलवण्यात येत आहेत. शनिवारी रात्री ड्रोनच्या सहाय्याने त्याचे फुटेज व्हायरल झाले होते. पोकलेन कशा पद्धतीने रूळ स्लीपर्स एका ठिकाणाहून काढुन एका लाईनमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे ते दाखवण्यात आले.

तीन मीटरने फलाट रुंद होईल त्यानुसार संपूर्ण फलाट हा सुमारे ७५० मीटर रुंद होईल त्यानुसार वाढलेल्या जागेचा फायदा सुमारे लाखभर प्रवाशांना होईल ही त्या कामाची फलश्रुती असेल असे सांगण्यात आले.रूंदी वाढवायला दोन टन वजनाचे ७८५ आरसीसी बॉक्स लावण्याचे काम सुरू होते.

असे होणार काम 
विशेष ट्रॅफिक ब्लॉकच्या सहाय्याने इन्फ्रा ग्रेड पद्धतीने काम हे शनिवारी पहाटे ६ वाजल्यापासून सुरू करण्यात आले. 
संध्याकाळपर्यन्त आरसीसी बॉक्स टाकून फलाट रुंद केला जाईल. 
त्या कालावधीत पोकलेन आणि रोलरच्या सहाय्याने अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 
त्या।कामी १ पोकलेन आणि रोलर हे विवीध साधनसामग्री न्यू मुलुंड गुडस स्टेशनच्या सहाय्याने कामाच्या ठिकाणी पोहोचवत असल्याचे सांगण्यात आले.
त्या सोबतच कामाच्या ठिकाणी रेल्वे रुळातील गॅप खडी, माती टाकुन भरण्याचे काम सुरू होते. रूळ समांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले।होते.

या आधीच गोयल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनूसार सगळ्यात वर्दळीचा असलेला फलाट ५ असून त्या ठिकाणी त्याच्या रुंदीचे काम करणे अत्यावश्यक होते. ते काम सुरू असून त्यातून पादचारी पूल, एस्कलेटर सुविधा देता येतील. त्याद्वारे प्रवाशांना अधिकाधिक त्यामुळे दिलासा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title: The width of platform 5 in Thane station will benefit 1 lakh passengers, General Manager, Divisional Managers inspected the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.