कोकणात जाणाऱ्या नागरिकांना बाप्पा पावणार?; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर
By अनिकेत घमंडी | Published: August 26, 2022 10:55 AM2022-08-26T10:55:21+5:302022-08-26T10:57:16+5:30
मुंबई गोवा महामार्गावरील एनेचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनीही काम युद्धपातळीवर सुरू असून दिवसरात्र खड्डे बुजवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले
डोंबिवली - गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दौरा नागोठणेपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम समाधानकारक असून गणपती बाप्पा पावणार असे मत चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही त्यास दुजोरा देत काम समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील एनेचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनीही काम युद्धपातळीवर सुरू असून दिवसरात्र खड्डे बुजवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू असून गणेशोत्सवादरम्यान रस्तावरील खड्डे कमीतकमी कसे राहतील यादृष्टीने त्यांनी अभियंता अधिकार्याना सूचना दिल्या आहेत. पावसाचा अडथळा येत असल्याने कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची त्यांनी पाहणी केली, माध्यमांना माहिती दिली. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांसह अधिकारी उपस्थित होते.
डोंबिवली - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू असून गणेशोत्सवादरम्यान रस्तावरील खड्डे कमीतकमी कसे राहतील यादृष्टीने त्यांनी अभियंता अधिकार्याना सूचना दिल्या. प्रशांत ठाकूर, भरत गोगावले यांसह अधिकारी यावेळी उपस्थित होते. pic.twitter.com/CavEtbqOWb
— Lokmat (@lokmat) August 26, 2022